26/11 Mumbai Attack Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचा हात, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

26/11 Mumbai Attack: मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा खळबळजनक दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Priya More

'मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता.', असा खळबळजनक दावा भाजपचे नेते माधव भांडारी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. माधव भांडारी यांनी रविवारी हे खळबळजनक वक्तव्य केले. माधव भांडारी यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मोहम्मद अजमल कसाबसह १० पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर 26/11 चा हल्ला केला. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये हा हल्ला करण्यात आला होता. माधव भांडारी यांनी सांगितले की, '26/11 च्या हल्ल्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. स्थानिकांच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होऊच शकत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या हल्ल्यामागे अदृश्य हात होता. त्या लोकांना हल्ला होणार याची कल्पना होती.' तसंच, 'दाभोळकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी या हत्या साखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र आहे.', असा देखील आरोप माधव भांडारी यांनी केला.

माधव भांडारी यांनी काँग्रेसवर केलेल्या गंभीर आरोपावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'सध्या माधव भंडारी यांना चिंता आहे. माधव भंडारी भाजपमध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही त्यामुळे बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळ उडवून त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो. जे आरोप माधव भंडारी यांनी केले खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या माणसांनी करावे असे ते आरोप आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT