Chitra Wagh- Gautami PAtil Saam TV
महाराष्ट्र

Chitra Wagh on Gautami Patil: 'गौतमी पाटील अश्लील डान्स करत असेल, तर...' चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

माझ्याकडे गौतमी पाटीलची माहिती असती तर मी नक्की कारवाईची मागणी केली असती असतं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

जालना : भाजप नेत्या चित्रा वाघ या उर्फी जावेदवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी करत आहेत. उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मात्र चित्रा वाघ यांना डान्सर गौतमी पाटीलवर कधी भूमिका का नाही घेतली असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर माझ्याकडे तिच्याबाबत माहिती असती तर मी नक्की कारवाईची मागणी केली असती असतं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

गौतमी पाटील कोण आहे हे मला माहित नाही.गौतमी पाटील अश्लील डान्स करत असेल तर तिचा विरोध करायला पाहिजे.गौतमीच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे पाठवल्या असत्या तर मी त्यावर बोलले असते, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

मनोरंजन क्षेत्र आणि माझा दूर दूरपर्यंत संबंध नाही. गौतमी पाटील अश्लील डान्स करत हे तुमच्यापर्यंत आलं. म्हणजे ही गोष्ट इतर महिला नेत्यांकडेही आली असेलच. मग मग त्या चित्रा वाघची वाट पाहत होत्या का?

मात्र कुणीही याबाबत भूमिका का नाही घेतली. मात्र माझ्यापर्यंत ही गोष्ट आली असती तर मी नक्कीच भूमिका घेतली असती. मी स्वत: गौतमी पाटीलचे व्हिडीओ पाहिले नाहीत. माझ्यापर्यंत व्हिडीओ क्लिप्स आल्या असत्या तर मी नक्कीच विरोध केला असता, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इथेनॉलबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना मोठा झटका

DA Hike Update : महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार? दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

Death Sign : मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं 'हे' ३ संकेत, वेळीच ओळखा!

Top 5 Signs of Liver Issues: डोळ्यांतील या खुणा सांगतात तुमचं लिव्हर कसं काम करतय? फॅटी लिव्हरची 5 लक्षणे वेळीच ओळखा

Election: मोठी बातमी! राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी?

SCROLL FOR NEXT