Rahul Gandhi Vs BJP Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047ची वाट पहावी; भाजप नेत्याची खोचक टीका

"राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

Amravati Chandrashekhar Bawankule News : जनतेच्या मनात असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान होऊ शकतात अस विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047 ची वाट पहावी तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाच स्वप्न त्यांचं खरं होणार नाही 150 देशांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेच समर्थ पंतप्रधान मोदींना आहे असा टोला माझे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि राहुल गांधीना (Rahul Gandhi) लगावला आहे.

वंचित आणि शिवसेनेची युती होत असेल तर त्यात आम्हाला काहीही आक्षेप नाही त्यांचा तो अधिकार आहे, मात्र उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पक्षाचे आमदार टीकवता आले नाही. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये घटक पक्ष कसे सांभाळावे हे जे गुण आहेत. ते गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणत्या गुणांवर जात आहे हे मला माहित नाही.

आपल्याच पक्षातील आमदारांना उद्धव ठाकरे सांभाळू शकत नाही तर घटक पक्षाला काय सांभाळतील असा खोचक टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते अमरावती येथे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमरावतीला बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happiest City: जगातील टॉप रँकिंग सर्वात आनंदी शहर कोणते? जाणून घ्या

Shivali Parab : नजरेचा नखरा अन् नथीचा तोरा, शिवाली परबचं आरस्पानी सौंदर्य

Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाताय? आताच सावध व्हा, फसवणुकीचा धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील राजुरामध्ये मतचोरी कशी झाली?, राहुल गांधींनी सांगितली संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT