Bavankule on Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Bawankule on Sharad Pawar: शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

NCP Crisis Political News: फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार यांनी अनेक युक्त्या केल्या.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : अजित पवार आणि इतर आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाचा जो विकास झाला त्यासाठी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असं भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. अजित पवार आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्र घडवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे.

शरद पवार यापूर्वीही रस्त्यावर उतरले आहे. हा जो खेळ सुरू झाला तो शरद पवार यांनीच सुरू केला. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून सुरुवात कुणी केली. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार यांनी अनेक युक्त्या केल्या. त्यामुळे जे पेरलं तेच उगवलंय, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

भाजपने कुठलाही ऑपरेशन लोटस केलेलं नाही. आम्हाला त्याची गरजच पडली नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आले ते उद्धव ठाकरे यांना कंटाळून आले. तर अजित पवार यांच्यासोबत जे आले ते मोदींच्या ९ वर्षाचा कामकाज पाहून आले आहे, ते देशासाठी आले आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं.

आम्ही कोणतीही फोडाफोडी केली नाही. आमचे संस्कार घर फोडण्याचे नाही. भाजपने कुणाचे घर फोडलेले नाही. भाजपचे संस्कार जोडण्याचे आहे, असंही ते म्हणाले. (Political News)

खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा

खातेवाटप बद्दल मुख्यमंत्री बोलतील. तो अधिकार त्यांचा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांच्यासोबत आलेले सर्व आमदार सरकारमध्ये योग्य पद्धतीने काम करत आहेत. एकनाथ शिंदे जे ठरवतील तेच होणार आहे. चांगलं सरकार बनलं आहे. एकनाथ शिंदे सारखा मर्द नेता मुख्यमंत्री आहे. सोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सारखे नेते आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

Viral Video: पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केल्याचा राग अनावर अन् मग लाथा- बुक्क्यांनी एकमेंकाना कुट-कुट कुटले; हाणामारीचा व्हिडिओ पाहा

Laapataa Ladies : ऑस्करसाठी 'लापता लेडीज'च्या दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय, थेट नावचं बदललं

Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी

SCROLL FOR NEXT