Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

BJP on INDIA Meeting : 'इंडिया'ची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Political News : मोदीजींना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज मसूरकर

Mumbai News :

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. मोदीजी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, अशी टीकाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. (Latest News Update)

‘क्विट इंडिया‘चा नारा

सामनातील अग्रलेखावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं की, तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढं जास्त प्रेम करेल.

महात्मा गांधीजींनी ‘क्विट इंडिया‘चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्या सारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे. (Political News)

मोदीजींचा तुमच्या(I.N.D.I.A.)विरोधातील संघर्ष हा स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव ‘ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदीजींच देशसेवेचं कार्य अखंड सुरू राहणार आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानचे डोहाळे लागले

विरोधी पक्ष नेता बनवता येईल एवढ्या सुद्धा जागा मिळणार नाही. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानचे डोहाळे लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी एखादी लोकसभा लढावावी. यांच्यात एकमत होणार नाही, ठिणगी पडेल. मोदी हेच पुन्हा पंतप्रधान बनतील. काँग्रेसला विरोधीपक्ष नेताही बनवता येणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT