भाजप नेत्याचा वाढदिवस की कोरोना निमंत्रणाची जत्रा; जमावबंदीत काढली रॅली
भाजप नेत्याचा वाढदिवस की कोरोना निमंत्रणाची जत्रा; जमावबंदीत काढली रॅली Saam TV
महाराष्ट्र

भाजप नेत्याचा वाढदिवस की कोरोना निमंत्रणाची जत्रा; जमावबंदीत काढली रॅली

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू आहे. मात्र प्रशासनाची ही जमावबंदी झुगारून बीडमध्ये भाजप नेता तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांचा, बीड शहरात (Beed) फटाक्यांची आतिषबाजी करत, शेकडो मोटारसायकल अन फोर व्हीलरची रॅली काढत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. "शहेंशहा बादशहा, शेर दिलं अपना नेता"..."मै हू डॉन" गाण्यांवर 2 तास धांगडधिंगा करण्यात आलाय. विशेष म्हणजे भाजप नेता असणाऱ्या स्वप्नील गलधर यांचही डीजेच्या तालावर भान हरपलं अन् या नेत्याच्या वाढदिवसाला कोरोनाचे (Corona) सर्वच नियम पायदळी तुडवले गेले.

नेत्यांचा वाढदिवस आणि मोठा गाजावाजा हे बीडचे जणू समीकरणच बनले आहे. बीडमधील भाजप नेता तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त उत्साही कार्यकर्त्यांनी नेत्याला खुष करण्यासाठी मोठ्या दिमाखात गाजावाजा केला. बीड शहरातून भव्य रॅली काढत शहरातील, महत्वाचा समजला जाणाऱ्या, शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. वाढदिवसानिमित्त अक्षरशः डीजे लावण्यात आला. यावेळी अरे दिवानो मुझे पहेंचानो, मै हू डॉन.... शहेनशहा बादशहा शेर दिल अपना नेता.. या गाण्यांवर कार्यकर्त्यांसह भाजप नेता स्वप्नील गलधर हे देखील थिरकले. हा वाढदिवस बीड शहरातील स्वराज्य नगर भागत साजरा करण्यात आला.

यावेळी कोरोनाचे सर्वच नियम ढाब्यावर बसविण्यात आले. इथे कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हते, ना सोशल डिस्टनसिंग होता. तब्बल 2 तास हे वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू होते. मात्र अद्याप प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नाही. दरम्यान हा वाढदिवस चार दिवसांपूर्वी झालेला असून या वाढदिवसानिमित्त भाजप नेता स्वप्नील गलधर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सर्वच हद्द पार केल्याचे दिसून आले. सध्या सेलिब्रेशनचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांचं आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT