PSL 2022: 40 वर्षीय मलिक ठरला 'नवाब'; युवा बाबरच्या संघाला चारली धुळ

4 फेब्रुवारीला पेशावर झल्मी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कराची किंग्जचा 9 धावांनी पराभव झाला.
PSL 2022- Shoiab Malik
PSL 2022- Shoiab Malik Saam TV

PSL 2022: पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) बाबर आझमच्या (Babar Azam) कर्णधारपदाची अवस्था अतिशय वाईट आहे. त्याचा संघ कराची किंग्स हा चालू हंगामातील पहिला संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. कधी बाबर आझमचा फ्लॉप शो तर कधी समोरच्या संघाची जबरदस्त कामगिरी. बाबर अँड कंपनीचा प्रत्येक प्रयत्न व्यर्थ जात आहे. आता 40 वर्षीय शोएब मलिकने बाबर आझमच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याच्या दमदार खेळामुळे पेशावर झल्मीनेही कराची किंग्जला नेस्तानाबुत केले आहे.

4 फेब्रुवारीला पेशावर झल्मी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कराची किंग्जचा 9 धावांनी पराभव झाला. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांमधील कराची किंग्जचा हा चौथा पराभव आहे. त्याचवेळी पेशावर झल्मीचा हा 4 सामन्यांमधला दुसरा विजय ठरला आहे. पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतताना दिसत असला तरी त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले आहे.

PSL 2022- Shoiab Malik
Beed: शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर; 100 कोटींच्या भूमीपूजन कार्यक्रमाला सेनेचा विरोध

शोएब मलिकने ठोकले दमदार अर्धशतक

या सामन्यात पेशावर झल्मीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 173 धावा केल्या. पेशावरच्या संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शोएब मलिकचा मोठा हात होता, तो शेवटपर्यंत नाबाद राहिला, त्याने 28 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान शोएब मलिकने 25 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने आपले अर्धशतक पूर्ण केले.

बाबर आझमने इतिहास रचला तरीही संघ पराभूत

कराची किंग्जसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची सुरुवात खराब झाली. अवघ्या 3 धावांत 2 विकेट पडल्या. पण बाबर आझम एका बाजूने खिंड लढवत होता. बाबर आझमने संघाला विजयाची आशा दाखवली, आपले स्पर्धेतील पहिले अर्धशतकही पुर्ण केले. पण ते म्हणतात ना क्रिकेट हा खेळ एकद्याचा नाही. एकट्याची झुंज अपयशी ठरली आणि संघ पराभूत झाला. बाबर आझमने 63 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकरासह नाबाद 90 धावा केल्या. या खेळीसोबत त्याने पाकिस्तान सुपर लिगमध्ये 2200 धावांचा टप्पाही पुर्ण केला आहे. पीएसएलच्या इतिहासात 2200 धावा करणार बाबर हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

बॅटने कमाल दाखवणाऱ्या मलिकची गोलंदाजीतही करामत

उत्कृष्ट फलंदाजीकरुन संघाला भक्कम धावसंख्या उभारुन दिल्यानंतर शोअब मलिकने आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवले. त्याने आपल्या गोलंदाजी दरम्यान 3 फलंदाजांना तंबुच्या आश्रयाला पाठवले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com