chandrakant patil  saam tv
महाराष्ट्र

महात्मा फुले-डॉ. आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळं पुन्हा वाद पेटला

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवरील केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chandrakant Patil News : राज्यात महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू आहे. याचदरम्यान, भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवरील केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 'कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेतील पैठण येथील संतपिठाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

'कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील या कार्यक्रमात पुढे म्हणाले, 'अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशामध्ये शाळा कुणी सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली'.

'शाळा सुरु करायच्या आहेत आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा-दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेऊन 'सीएसआर'च्या माध्यमातून पुढं गेलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

काय म्हणाले होते राज्यपाल?

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यपाल म्हणाले होते, 'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील'

'शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT