जयंत पाटील सुशांत सावंत
महाराष्ट्र

सत्तेत येण्यासाठी भाजपकडून सगळ्या मार्गाचा अवलंब सुरु - जयंत पाटील

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्रसरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने भाजपकडून सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय असा आरोप जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- सुशांत सावंत

सिंधुदुर्ग : मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही. ते निर्दोष होतीलच परंतु माणसाला मानसिक छळ करण्याचे काम आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्रसरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला.

हे देखील पहा :

कुठलंही काम हे मेरीटने होणार यामध्ये मराठी आणि अमराठी असल्याचा विषय येत नाही. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना २८ महिने ईडीने तुरुंगात ठेवले ते मराठीच होते ना मेरीटनेच सगळे होणार आणि आघाडी सरकार कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमचं सरकार निष्पक्षपातीपणाने काम करतंय...जी कागदपत्रे पुढे येत आहेत ती धक्कादायक आहे. हे धक्कादायक असल्यानेच एनसीबीने दिल्लीहून चौकशी समितीने त्यांची चौकशी केली. त्यामुळे त्यांचे दाखले हा विषय नसला तरी त्यापेक्षा खंडणीचा जो प्रकार आहे हा अगोदर कधी प्रकार कधी घडला नाही आताच्या राजवटीत मात्र ते सुरु आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

समस्या काय आहे की, मी पक्षाच्या कामाचा आढावा घेतोय, कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, त्यांना बुथ कमिट्या करा, यंत्रणा उभ्या करा असे सांगतानाच हे पाहण्यासाठी 'मी पुन्हा येईन' असे सांगत आहेत त्यामुळे लोकं या वाक्याला खूप हसतात, हे जे वाक्य आहे त्याला पर्यायी वाक्य शोधतोय परंतु ते मिळत नाही म्हणून 'मी पुन्हा येईन' हे वाक्य वापरत आहे असे सांगताच पुन्हा एकदा पत्रकारांमध्ये हशा पिकला.

जिल्हा परिषदेत आघाडी जर झाली तर आघाडीची चर्चा करण्याअगोदरच स्वबळाची भाषा बोलणं म्हणजे थोडंसं आघाडी करायचीच नाही अशा भावनेतून बोलण्यासारखं होतं तशी आमची भावना नाही. आघाडीला आमचं प्राधान्य आहे. स्वबळाचा नारा आज द्यायची गरज नाही. सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सामंजस्याने, चांगल्या पद्धतीने या जिल्हा परिषदेत काम करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT