Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

यापुढे महाराष्ट्रात भाजपचं सरकार कधीच येणार नाही; संजय राऊतांचं वक्तव्य

'सरकारला अडीच वर्षे झाली विरोधकांना अडीच वर्षे झोप लागत नाही. रोज वेगवेगळी तारीख भाजपचे नेते देत आहेत.'

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : महाराष्ट्रात यापुढे भाजपचं सरकार कधीच येणार नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरात केलं. मनसेचे माजी जिल्हा प्रमुख दिवाकर पाटील यांनी आज कागल येथे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्षप्रवेश केला या कार्यक्रमा दरम्यान राऊत बोलत होते.

ते म्हणाले, ' २०१४ साली मी इथं आलो होतो. त्यावेळी इथले पैलवान आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत होतो. आता आम्ही गळ्यात गळे घालून आहोत. आज सकाळीच हसन मुश्रीफ साहेब (Hassan Mushrif) यांचा फोन आला होता. स्वाभिमान हा शब्द कोणत्या मातीत रुजला असेल ती भूमी कोल्हापूरची आहे.

शाहू महाराज यांच्या विचाराने आताचं महाविकास आघाडी सरकार चालत आहे. आपल्या सरकारला अडीच वर्षे झाली. विरोधकांना अडीच वर्षे झोप लागत नाही. रोज वेगवेगळी तारीख भाजपचे नेते देत आहेत. सरकार पडण्याची तारीख पे तारीख दिली जात आहे. आम्ही अडीच घर चाललो आहोत. तुम्हालाच खेळता येत असं नाही. तर आम्हाला खेळता येत आणि खेळवताही येत' असं म्हणत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

हे देखील पाहा -

भाजपवाले (BJP) सतत हा फुटणार तो फुटणार सांगत सुटले. या कागल नगरीत सांगतो यापुढे महाराष्ट्र राज्यात भाजपचे सरकार कधीच येणार नाही. असं देखील राऊत यावेळी म्हणाले. राऊत पुढे म्हणाले, 'शाहू महाराजांनी भाजपचा बुरखा फाडला, ३० वर्षे भगवा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या संजय पवार (Sanjay Pawar) यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. आमच्या राष्ट्रभक्तीमध्ये कुठेही भेसळ नाही.

गेल्या ३ वर्षात ५० हल्ले झाले आहेत, यांचे काही नेते म्हणतात पोलीस बाजूला करा मग सांगतो. आम्ही म्हणतो ईडी बाजूला करा मग आम्ही पण सांगतो. राम ते औरंगजेब असा यांचा प्रवास सुरु आहे. ऊठ सूट कबरीच काय झालं म्हणतात, ती कबर केंद्राच्या ताब्यात आहे ती फोडून दाखवा असं आव्हानचं राऊतांनी भाजपला दिलं.

तसंच काश्मीरमध्ये रोज कश्मिरी पंडितांची हत्या होते. यावर कधी पंतप्रधान बोलत नाही. भाजपवाल्यांचे हिंदुत्व कुठं आहे तर ज्ञानव्यापीमध्ये, ते महागाईवर कोण काही बोलत नाहीत, बेरोजगारीवर कुणी बोलत नाही. सत्तेवर आल्यावर दोन कोटी नोकऱ्या देणार होता त्या कुठे गेल्या? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT