bjp former mp pratap sonwane passed away at 75 in dhule
bjp former mp pratap sonwane passed away at 75 in dhule Saam TV
महाराष्ट्र

Pratap Sonwane Passed Away: भाजपच्या माजी खासदाराचं वाढदिवशीच निधन; कुटुंबियांवर शोककळा

Satish Daud-Patil

Pratap Sonwane Passed Away

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा नारायण सोनवणे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी प्रतापदादा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी त्यांचा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवशीच प्रतापदादांची प्राणज्योत मालावली आहे. त्यांच्या जाण्याने मतदारसंघातून हळहळ व्यक्त होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रतापदादा जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. पक्षासोबत असलेली निष्ठा पाहता त्यांना भाजपने नाशिक महानगरपालिकेची उमेदवारी दिली होती. मात्र, त्यात प्रतापदादा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून सलग प्रतापदादा सलग दोनवेळा निवडणूक आले.

मतदारसंघ पूर्नरचनेत धुळे हा नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्याने प्रतापदादा यांना २००९ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. शैक्षणिक क्षेत्रात दादांचे मोठे योगदान राहिले.

मराठा विद्या प्रसारक शिक्षण (मविप्र) संस्थेचे अध्यक्ष व सभापती अशी पदे त्यांनी भूषवली होती. प्रतापदादा यांच्या पाठीमागे राजकीय वारसा होता. त्यांचे वडील दिवंगत नारायण सोनवणे हे बागलाण मतदारसंघाचे आमदार होते. प्रतापदादांच्या निधनाचं वृत्त कळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शोक व्यक्त केला.

प्रतापदादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले. प्रतापदादांनी कधीही सत्ता वा कसलाही मोह ठेवला नाही. आपले आयुष्य जनतेप्रती समर्पित केले. एक चांगला व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आपण गमावला आहे, असंही दादा भुसे यांनी म्हटलं आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: अत्यंत खेदजनक! मत न देताच परत यावं लागलं, सावनी रवींद्रने व्यक्त केला संताप

Gadchiroli News: गडचिरोलीत मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात ३ नक्षलवाद्यांचा खात्मा; एके-४७, इन्सास रायफल जप्त

Maharashtra Election Voting LIVE : मावळ लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान

Maggie Samosa: घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत मॅगी समोसे; रेसिपी पाहा

Sunil Gavaskar Statement: 'IPL सोडून देशाकडून खेळणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी..' सुनील गावसकरांची BCCI कडे मागणी

SCROLL FOR NEXT