BJP expels Vijay Chaudhary amid Nandurbar controversy Saam TV Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Hina Gavit latest news : नंदुरबार भाजपमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हिना गावित यांच्याविरोधातील कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने ही कठोर कारवाई केली.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Vijay Chaudhary Hina Gavit BJP latest news : नंदुरबार जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद आणखी चिघळला आहे. त्यामुळे पक्षाने यावर अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्या हिना गावित यांच्याविरोधातील एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षाने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि भाजपच्या स्थानिक गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्याविरोधात माजी महामंत्री विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. या प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्या ऑडिओ क्लिपमध्ये पक्षांतर्गत राजकारण आणि स्थानिक नेत्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्ये समोर आल्याचे सांगितले जात आहे.

या व्हायरल ऑडिओ प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची गंभीर दखल प्रदेश नेतृत्वाने घेतली. अखेर पक्षाने अधिकृत पत्रक जारी करत विजय चौधरी यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली. तसेच त्यांना पक्षातील सर्व प्राथमिक सदस्यत्वावरून आणि जबाबदाऱ्यांतून तात्काळ मुक्त करण्यात आले आहे.

भाजपकडून डॅमेज कंट्रोल, मुंबईत बैठकांचे सत्र

या घटनेनंतर भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत आहेत. स्थानिक स्तरावरील गटबाजी आणि वाद मिटवण्यासाठी भाजपकडून जोरदार 'डॅमेज कंट्रोल' सुरू करण्यात आले आहे.

नंदुरबारमधील स्थानिक वाद वाढल्यास त्याचा आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होऊ शकतो, हे ओळखूनच पक्षाने चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करून शिस्तभंगाचा स्पष्ट संदेश दिला आहे. एका बाजूला नाराज नेत्यांना शांत करणे आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखणे, हे मोठे आव्हान सध्या भाजप प्रदेश नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक निर्णय! आता व्हॉट्सॲपवर मिनिटांत मिळणार पास; जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT