BJP Defeat in Maharashtra Due to Manoj Jarange Patil? Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे फँक्टर पडला भाजपवर भारी, मराठवाड्यात भोपळा; विदर्भात तब्बल ८ जागा गमावल्या

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Analysis | मनोज जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा गेम झाल्याचं बोललं जातंय. मराठवाड्यात भाजपला भोपळा, विदर्भात तब्बल ८ जागा गमावल्या लागल्या आहेत.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपला मराठवाडा-विदर्भात मोठा फटका बसला. ५ वर्षांपूर्वी भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांनी यावेळी भाजपला अक्षरश: खड्यासारखा बाजूला केला. परिणामी निवडणुकीच्या मैदानात लढता-लढता भाजपचे उमेदवार धारातीर्थी पडले.

रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांसारख्या दिग्गजांचा दारुण पराभव झाला. भाजपला मराठवाड्यात भोपळाही फोडता आला नाही. शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरची एक जागा जिंकत कशीबशी आपली प्रतिष्ठा राखली. एकंदरीत ८ पैकी ७ जागा महायुतीने गमावल्या.

दुसरीकडे विदर्भातही महायुतीची चांगलीच दाणादाण उडाली. १० पैकी तब्बल ८ जागांवर त्यांना पराभव स्विकारावा लागला. महायुतीच्या या पराभवाला मनोज जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. ५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ निवडणुकीत विदर्भ-मराठवाड्यातील मतदारांनी महायुतीवर भरभरून प्रेम केलं होतं.

त्यावेळी महायुतीला विदर्भात ९ आणि मराठवाड्यात ७ जागांवर विजय मिळवता आला होता. यंदा या दोन्ही विभागात महायुतीची चांगलीच घसरगुंडी झाली. त्यांना केवळ ३ जागाच जिंकता आल्या. जालना, लातूर आणि नांदेड हे मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले.

ठाकरे गटालाही सहानुभूतीचा मोठा फायदा झाला. हिंगोली, परभणी आणि धाराशिव मतदारसंघात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे शरद पवार यांना देखील मतदारांनी चांगली साथ दिली. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत भाजपला हादरा दिला.

मनोज जरांगे फॅक्टरचा भाजपा फटका?

आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महायुती सरकारमध्ये चांगलंच बिनसलं होतं. सत्ताधाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. त्यातच बीड येथील दंगलीनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. यात मनोज जरांगे यांचं नाव घेण्यात आलं.

त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा वास येतोय, अशी भाषा कॅमेऱ्यासमोर वापरली. त्यामुळे मराठा समाजाचा आणखीच उद्रेक झाला. सोशल मीडियावर फिरण्याऱ्या पोस्टमुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा संघर्ष रंगला. देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत जरांगेंनी गंभीर आरोप केले.

पुढे हे प्रकरण थोडं शांत झालं. मात्र, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत असं पाडा की त्यांच्या पुढच्या ७ पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजे, असं मनोज जरांगेंनी मराठा मतदारांना सांगितलं होतं. परिणामी निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय सामना रंगला. याच गोष्टीचा मोठा फटका महायुतीला बसल्याचं बोललं जातंय.

संदिपान भुमरे यांनी जरांगेंची मनधरणी करत त्यांचा मान राखल्याने त्यांना मराठा समाजाने साथ दिली. त्यामुळे खैरेंचा पराभव झाला. रावसाहेब दानवे आपल्या विधानानेच अडचणीत आले अन् मराठा समाजाच्या रोषाला सामोरे गेले, अशीही चर्चा होत आहे. तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टरच्या चर्चांनी आणखीच जोर धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT