भाजप नगरसेवकांना लागले निवडणुकीचे वेध Saam Tv
महाराष्ट्र

भाजप नगरसेवकांना लागले निवडणुकीचे वेध

मतदारांच्या संपर्कासाठी नगरसेवक घरोघरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर - आगामी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीचे वेध सत्ताधारी भाजप नगरसेवकांना लागले आहे. भाजप नगरसेवकांनी आतापासूनच घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. यासाठी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची पुस्तिका भाजप नगरसेवकांनी तयार सुरु केली आहे. ही पुस्तिका घेऊन नगरसेवक मतदारांपर्यंत पोहचत आहेत.

हे देखील पहा -

या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचारच नगरसेवकांनी सुरू केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, अँटी इनबन्सी आणि काही नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळं मतदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं भाजप कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाही. आचारसंहितेपुर्वी मतदारांशी संपर्क वाढवा अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं नगरसेवक पाच वर्षांचा लेखाजोखा घेऊन मतदारांना मतांचा जोगवा मागत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Kitchen Wall Colour: किचनच्या भिंतींना चुकूनही हे 3 रंग लावू नका; कुटुंबात होईल कडाक्याचे भांडण

Gold Rate: गूड न्यूज! सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, प्रति तोळा ₹१०००० ने स्वस्त; प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले; वाचा ताजे दर

Instant Sabudana Khichdi: साबुदाणे भिजवायला विसरलात? अशी बनवा मऊ-मोकळी इंस्टंट खिचडी

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची आज निवड

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला धड चालताही येईना, म्हणतो 'ताकद नाही राहिली', पोलिसांसमोर ढसाढसा रडला, VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT