Eknath Shinde-Shiv Sena to Contest Fewer Seats Saam
महाराष्ट्र

मुंबईत भाजप १२५ जागांवर लढणार; शिंदे, अजित पवारांच्या वाट्याला किती? जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर

Eknath Shinde-Shiv Sena to Contest Fewer Seats: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं रणशिंग फुंकले. भाजप पक्षाला १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास. शिंदे गटाने कमी जागा लढवण्यास सहमती दर्शवली.

Bhagyashree Kamble

  • 'भाजपच मोठा भाऊ'

  • शिवसेना शिंदे गट कमी जागांवर लढणार?

  • राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार?

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहू लागले आहे. दिवाळीनंतर राज्यात निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलंय. मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंच्या विरोधात महायुतीकडून रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप अन् राष्ट्रवादी ताकदीने सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबई मनपासाठी महायुतीकडून जागावाटपाची तयारी सुरू झाली असेल.

मिळालेल्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये जागावाटपात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असू शकतो. २२७ जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही जवळपास १०० च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाकरेंपासून दूर झाल्यानंतर शिंदेंनी मुंबईमध्येही आपली ताकद वाढवली असून, २०२२ पासून जवळपास ५० माजी नगरसेवकांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटप कळीचा मुद्दा ठरेल, यात शंकाच नाही.

शिवसेना भाजपपेक्षा कमी जागा लढवण्यास सहमत

राजकीय निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच जागापेक्षा विजय महत्वाचा असल्याचं सांगितलं. यावरून हे अधोरेखित होतं की, बीएमसी निवडणुकीत शिवसेना भाजपपेक्षा कमी जागांवर लढण्यास सहमत होईल.

भाजप मोठा भाऊ

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना जागावाटपात समान जागा मिळाल्या. तर, विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपच्या तुलनेत फक्त दोन जागा कमी मिळाल्या. बीएमसी निवडणुकीत, शिवसेना कमी जागांवर लढण्याबाबत सहमती दर्शवेल अशी माहिती आहे. भाजप पक्षाला १२५ हून अधिक सीट्स मिळण्याची शक्यता आहे. तर, काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटात इनकमिंग

२०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे २०० हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. दरम्यान, २०२२ नंतर ज्यांचा कार्यकाळ संपला, अशा ५५ माजी नगरसेवकांनी जे शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित होते, त्यांनी शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, 'मुंबईचा महापौर हा महायुतीतील असेल. जागावाटप करताना वार्डामधील संबंधित पक्षातील ताकद पाहिली जाईल. त्यानुसार तिकीट मिळेल', रविवारी रात्री शाखाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिंदे बोलत होते. 'जिथे विजय निश्चित आहे, तिथेच जागा लढवाव्यात. जर हे तत्व पाळले गेले तरच महायुतीचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकेल', असंही शिंदे म्हणाले.

'आम्ही १५० जागा जिंकू'

मु्ंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी विश्वास व्यक्त केला की, 'महायुतीमधून आम्ही १५० जागा जिंकू. सर्व पैलूंचा विचार करून आम्ही प्रभाग आणि वार्डनुसार विभागणी करू. त्यानुसार आम्हाला १५० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास आहे. दरम्यान, जागावाटपाबाबतची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. स्थानिक पातळीवरचा अंदाज घेऊनच अंतिम जागावाटप केला जाईल,' असं साटम म्हणाले. 'देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही युती चांगल्या स्थितीत आहे', असंही साटम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri chinchwad : शेअर मार्केटच्या नावाखाली ६४ लाखात फसवणूक; टोळी पोलिसांच्या ताब्यात

Jalna : जालन्यातील शेतकऱ्याने शेतातील भाजी काढण्यासाठी वापरला रोपवे | VIDEO

Natural Hair Growth: केस सतत गळतायेत, वाढ होत नाहीये? मग सकाळीच करा हे एक काम

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना सर्वसमावेशक मदत देण्याचा प्रयत्न असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करण्यासाठी किती तास लागतात?

SCROLL FOR NEXT