Maharashtra Live News Update: हिंगोलीत दोन गटात राडा, दगडफेकीत अनेक जण जखमी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये पूरस्थितीनंतर भयान अवस्था, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

हिंगोलीत दोन गटात राडा, दगडफेकीत अनेक जण जखमी

हिंगोलीच्या वेलतुरा गावात मिरवणुकीवरून दोन गटात राडा

गावात दगडफेक आणि मारहाण

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा गावामध्ये मारहाणीची घटना

अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना

पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

भरधाव वेगात आलेल्या कार आणि दुचाकीची एकमेकांना जोरदार धडक

दोन्ही वाहने पुलावर खाली कोसळली

भिमानदीवरील पुलाच्या कठड्यांची दुरवस्था,अंधार पुलावरील माती यामुळे अपघाताचा धोका

दोघे जण गंभीर... जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

जी गोष्टी शेतकऱ्यांना गरज आहे ते न करता हे पहा ते पहा त्यांनी काय केलं चालढकल करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे दुष्काळ जाहीर करा ही मागणी आमची आहे सरकारची मदत करते ती अत्यंत तटपुंजी मदत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत दिली पाहिजे नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहे ते कधीही दुरुस्त होणे शक्य नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कोणाकडे पाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा सरकारला सवाल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी केल्या जाणार आहेत अशी माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली आहे

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे

मात्र विरोधी पक्षाकडून विनाकारण राजकारण केलं जात आहे इतर वेळेला विरोधी पक्ष कुठे होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे

अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारणी उभारणी केली जाणार आहे

Beed : गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारातील 3 एकर बागायती जमीन वाहून गेली

- गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारातील तब्बल 3 एकर जमीन सिंदफणा नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहे.

- अक्षरशः 45 फुट खोलीपर्यंत जमिन वाहून गेली आहे.

- कल्याण काशिद यांची मोसंबीची बाग तर राजेंद्र काशिद यांचा ऊस वाहून गेला आहे.

- तर नदीलगतच्या राजेंद्र काशिद यांच्या घराचे नुकसान झाले आहे. काही भागही वाहून गेला आहे.

- पंचनामा झाला नसून पंचनामा करण्याची करण्यात आली आहे.

asaduddin owaisi : असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली 

अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवैसी यांची सभा पुढे ढकण्यात आली आहे.

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून पोस्टरबाजी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आलीये. शुल्क वाढ रद्द करावी म्हणत विद्यार्थ्यांनी पोस्टरबाजी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अधिसभा बैठक सुरू असताना मुख्य इमारत परिसरात आंबेडकरी संघटना प्रतिनिधींची शुल्कवाढ रद्द करावी आणि वसतिगृह प्रश्नांबाबत पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

भाडं थकलं, कार्यालय ताब्यात

TWJ कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाड थकवल्यामुळे सोसायटीने कंपनीच्या ऑफिसचा ताबा घेतला आहे. मागील तीन तासांपासून कंपनीमध्ये तपास सुरू आहे. चिपळूनमधील मुख्य कार्यालयात तपास सुरू आहे. 

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सांगली जिल्ह्यातील वेजेगांवच्या तरूणाला ७ वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सांगली जिल्ह्यातील वेजेगांवच्या तरूणाला ७ वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा. 

संतोष ऊर्फ राजेंद्र माणिक पाटोळे ( वय २९, वेजेगांव, ता. खानापूर ) असे आरोपीचे नांव आहे. 

विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी ही शिक्षा सुनावली. 

Maharashtra Live News Update: संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात किसान सभेचे आंदोलनक घुसले

ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना विक्री 50 हजार रुपयाची तातडीने मदत करावी, यासह शेतकऱ्यांच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात किसान सभेचे आंदोलनक घुसले. विभागीय आयुक्त कार्याच्या समोर सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकरी, कामगार विभागीय आयुक्तालयात अचानक घुसले. सुरूवातीला या आंदोलकांनी विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर हे सर्व आंदोलक अचानक आयुक्तालयात शिरले. आयुक्तांच्या दालना समोर बसल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. तिथे आंदोलकांनी ठाण मांडले. जवळपास तासभर कार्यकर्ते विभागीय आयुक्त कारल्याच्या दालनासमोर बसून होते. शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांशी चर्चा करून आपल्या मागण्याची निवेदन दिले. त्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्तालयाच्या बाहेरच्या जागी कार्यकर्त्यांनी आपल्या आंदोलन सुरू केले.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार आहे. राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nalasopara: नालासोपारा पूर्वेत कपड्याच्या दुकानाला भीषण आग

नालासोपारा पूर्वेकडील कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

दोन दुकान आगीच्या विळख्यात सापडल्याने मोठ्या प्रमाणावर दुकानांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान जळून खाक झाले आहे.

घटनास्थळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले असून जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करण्याची गरज नाही- एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना मदत करणं सर्वांचं आपलं कर्तव्य आहे. सरकार मदत करणार आणि शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार. सर्वांनी शेतकऱ्यांसाठी जी मदत करता येईल, ती करावी. शेतकऱ्यांना तात्काळ जीवनआवश्यक वस्तू देण्याची गरज आहे. त्यासाठी गहू, तांदूळ अन् १० हजार देण्याची सुरूवात झाली आहे. सत्ताधारी, विरोधक यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. मुलांची पुस्तके, वह्या वाहून गेली आहेत. आम्ही गेल्या आठवड्यापासून मदत पाठवण्याचे सुरूवात केली. त्या भागात लोक शेतकऱ्यांना मदत पोहचवत आहेत. शेवटच्या शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत मदत सुरू राहणार आहे.

साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता राहावी, तशी यंत्रणा लावली जाईल. कोल्हापूर पूराप्रमाणे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. डॉक्टरांची मोठी टीम त्या ठिकाणी पोहचली आहे. आरोग्य विभाग आणि खासगी डॉक्टर पूरस्थिती भागात योगदान देत आहत.

Eknath Shinde PC Live Update: शेतकऱ्यांना मदत करताना सर्व अटी, नियम बाजूला ठेवल्यात- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना मदत करताना अटी, नियम बाजूला ठेवून मागे उभे राहिले पाहिजे. अतिवृष्टी, संकट येत तेव्हा मदत करणारे आमचे सरकार आहे. फडणवीस, अजित पवार आणि मी दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ.

याआधीही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले आहे. आता आलेल्या संकटात पिकाचे नुकसान झाले. जमीन वाहून गेली आहे. पशूधनाचे मोठं नुकसान झालेय. घरे पडली आहेत. जिवितहानी झाली आहे. पाऊस थांबलाय. पण नदीच्या प्रवाहामुळे काही घरे पाण्याखाली आहेत. त्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

आशा परिस्थितीमध्ये आम्ही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही आम्ही निवेदन दिलेय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिघांच्या सहीचे पत्र मोदींना पाठवले आहे. केंद्र सरकार, मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेक योजना केंद्र अन् राज्याने केल्या आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील, याची ग्वाही देतो.

Eknath Shinde: शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहिले आहे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दौरे केले. शेतकऱ्यांचे संकट खूप मोठं आहे. शेतकरी बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशी पूरस्थिती पाऊस पडला नाही. संकट मोठं आहे. अशा स्थितीत सरकार खंबीरपणे मागे उभे राहिली.

शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहिले आहे. त्यामुळे आजही कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. संकट मोठं आहे, त्यामुळे मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. जवळपास ६० लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसात संपूर्ण नुकसानीचे आकडे येतील.

थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतील

थोड्यात वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतील. मोठी घोषणा करण्याची शक्यता.

शेतकऱ्यांना सर्वसमावेशक मदत देण्याचा प्रयत्न असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातल्या अतिवृष्टीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला.

जवळपास ६० लाख हेक्टरच्या शेतीचं नुकसान झाला असल्याचा अंदाज.

नुकसान झालेल्यांना मदत करणार.

नुकसानीचे आढावे २-३ दिवसांत पूर्ण होतील.

शेतकऱ्यांना सर्वसमावेशक मदत देण्याचा प्रयत्न असेल.

दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Thane: आमदार जितेंद्र आव्हाडांना धक्का, शिंदे गटाची ताकद वाढली

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या समवेत 15 युवकचे पदाधिकारी थोड्याच वेळात करणार शिवसेनेत प्रवेश.. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित करणार शिवसेनेत प्रवेश.. ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का.. थोड्याच वेळात आनंद आश्रम या ठिकाणी होणार प्रवेश..

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजाआड

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर 8 ते 25 टक्के नफा मिळवून देतो म्हणत सोशल मीडियावरून लिंक पाठवून खाजगी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीची जवळपास 63 लाख 95 हजार 500 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, बँकेच्या नोटीस आलेल्या शेतकऱ्यांची मागणी

बँकांनी शेतकऱ्यांची कर्ज वसुली करू नये:जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे बॅंकांना आदेश

कळंब तालुक्यातील संजीतपुर गावातील शेतकऱ्यांना येरमाळा येथील एसबीआय बॅंकेने पाठवल्या कर्जवसुलीच्या नोटीसा

अतिवृष्टीमुळे पिक गेलं,जनावरे वाहुन गेली, शेतकरी संकटात असताना बॅंकेने नोटीसा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

Ahilyanagar: नगर मनमाड महामार्गावर गेल्या चार तासांपासून वाहतूक कोंडी...

वाहनांच्या लांबच लांब रांगा...

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे वाहतूक कोंडी...

वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप...

पुणतांबा फाटा परिसरात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा...

रस्ता दुरुस्तीचे काम आणि महामार्गावरील खड्डे यामुळे प्रवाशांना फटका...

शिर्डीकडे जाणाऱ्या साई भक्तांच्या गाड्याही वाहतूक कोंडीत अडकल्या...

आमदार संजय गायकवाडांची पूरग्रस्त शेतकऱ्यांना 25 लाखांची मदत; दोन फ्लॅट विकले

राज्यातील उध्वस्त झालेल्या शेतकऱ्या च्या मदतीसाठी

अँकर

राज्यातील अतिवृष्टीने उध्वस्त झाला आहे त्याच्या मदतीला आ संजय गायकवाड धाऊन आले आहेत त्यांनी स्वतःचे दोन प्लॉट विकून आलेली 25 लाख रुपये सरळ मुख्यमंत्री फंडात जमा केली आहे.. त्याचा डी डी काढून जमा करण्यात येणार आहे..

राज्यातील पाहिला आ संजय गायकवाड आहेत त्यांनी तातडीने आपली संपत्ती विकून शेतकऱ्यांना मदत केली आहे

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने 50 लाख रुपयांची पूरग्रस्तांना मदत

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवला

चार हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पगार एकत्रित करून पूरग्रस्तांना आधार

महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केला ५० लाख रुपयाचा निधी

Washim: वाशिम जिल्हातील वंचित बहुजन कार्यकारणी बरखास्त करून नवी कार्यकारणी जाहीर...

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीवरून अनेक नाराजी नाट्य वंचित बहुजन आघाडी मध्ये पाहायला मिळत होतं त्या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी हे नाराज होते. त्यामूळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला फटका बसू नये या करिता ही कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून, वाशिमचे वंचित बहुजन आघाडीचे नवीन जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांची निवड करण्यात आली असून, सौ.किरण गिर्हे यांनी या पूर्वीच वाशिम वंचितच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आता नव्याने कार्यकारणी घोषित झाल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nanded: बारड येथे भाजपचे आमदार राजेश पवार यांची गाडी शेतकऱ्यांनी अडवली

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड या ठिकाणी नायगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार हे मुदखेड कडे जात असते वेळेस शेतकऱ्याने त्यांच्या गाडीला घेराव घेतला. आमदार पवार हे गाडी बसून जात असतानाची शेतकऱ्याना माहिती मिळताच गाडी आडवुन शेतकऱ्यांनी जाब विचारला. तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी केली. पुढच्या वेळेस सरकारमधील कोणत्याही आमदाराची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे

Raigad: रायगडमध्ये आरक्षण बचावसाठी कोळी, आदिवासी बांधवांचा एल्‍गार

रायगड जिल्ह्यातील कोळी, आदिवासी समाजाचा आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला आहे. राज्‍यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्‍या आरक्षणात हक्‍क सांगण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यामुळे रायगड जिल्‍ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या मागणीला विरोध करण्‍यासाठी आज अलिबाग येथील रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चात समाज बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज कोळी, आदिवासी समाज अलिबागमध्ये एकवटला आहे. आपल्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Dharashiv: धाराशीवच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.शेतजमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान,घरांची पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार जिल्हा अग्रणी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकामार्फत सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, सद्यःस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी.तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर असलेला होल्ड तातडीने हटवून शासनाकडून मिळणारे अनुदान व मदत रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

Paithan: पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन..

पैठण तालुक्यातील सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने आज पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील बिडकीन येथील निलजगाव फाटा येथे संतप्त शेतकरी यांनी रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी फोटोशूट करणारे मंत्र्याचे खाली मुंडके वर पाय असे प्रकारचे अशा प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात आली आहे.यावेळी या आंदोलनात बिडकीन व परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सरसकट अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत करा, मंत्र्यांनी शेतकऱ्यांना फसवणूक करु नये, दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्ते बाप्पासाहेब आम्ले यांनी केले आहे.

Sangli: सांगलीत मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तासगाव मध्ये बेमुदत उपोषण सुरू

आमरण उपोषण सुरू केले आहे.आरक्षणाचे अ, ब, क, ड प्रमाणे उपवर्गीकरण होई पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व नोकरभरती थांबवाव्यात,साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा,पुण्यात मातंग समाजासाठी मुख्य आर्टी संस्था उभारावी व निधी उपलब्ध करून द्यावा,यासहच विविध मागण्यांसाठी हे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येत असून

शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशांत सदामते यांनी दिला आहे.

जव्हारमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

आदिवासी समाजाच्या आरक्षण कोणालाही देऊ नये तसेच बंजारा, धनगर, तसेच अन्य समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी आज पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा हा निघाला आहे .

बंजारा समाज व धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नये या मुख्य मागणी देखील घेऊन हा मोर्चा जव्हार च्या प्रांत कार्यालयावर धडकणार आहे

फेकायचं म्हणजे किती ? त्याला काही मर्यादा आहेत की नाही? भाजप आणि या तीनचाकी रिक्षा सरकारचं असं झालंय की चाराण्याची मदत आणि बाराण्याची जाहिरात... धडधडीत चेक अकरा लाखाचा दिसतोय आणि शेलार ट्विटमध्ये 55 लाख रुपये सांगतात.. काय शेलार ठाकरेंवर दिवस रात्र टीका करून करून मेंदू झिजला की काय? तुमच्या या असल्या वाढीव गुणामुळेच फडणवीसांनी तुम्हाला बाजूला ठेवून कंबोजला जवळ केलाय बहुतेक. ? सुधरा
सुषमा अंधारे

दिवाळीमध्ये फराळ खायचं की चिखल खायचा, येवल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल..

राज्यात सर्वत्र परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे .पावसाने उघडीप दिली असली तरी शेतामधील पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही त्यामुळे उभी पिके आता सडायला लागली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव येथील अशोक कटके या शेतकऱ्याच्या दोन एकर सोंगणी केलेल्या मक्याच्या बिट्या पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यामध्ये मध्ये वाहून गेल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. तयार झालेली मका बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचे गोड स्वप्न पाहत होते. मात्र आसमानी संकटाने त्यांचे हे स्वप्न मातीमोल झाले. आता दिवाळी साजरी करायची कशी, फराळ खायचा की, चिखल खायचा असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपस्थित केला आहे.

Mumbai : - अंधेरी सहारा पी अँड टी कॉलनीतील इमारतीचा काही भाग कोसळला. अद्याप जखमी किंवा मृत कळू शकले नाही

Mumbai  : दसरा मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून 5000 शिवसैनिक जाणार

आझाद मैदान येथे होणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून सुमारे 5000 शिवसैनिक जाणार आहेत. तर जिल्हाभरातूनही शिवसैनिक उस्फूर्त पणे दसरा मेळाव्यासाठी रवाना होतील असा दावा शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. यावर्षीचा दसरा मेळावा आगळावेगळा होणार असून आगामी जिल्हापरिषद व महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील हजारो शिवसैनिक मोठ्या उत्साहात दसरा मेळाव्यासाठी दाखल होतील अशी माहीती ही संजू परब यांनी सावंतवाडी येथील दीपक केसरकर यांच्या शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या पावसाळ्यातील गोदावरीला आलेला सर्वात मोठा पूर ओसरला

- नाशिक शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतल्यानं गोदावरीचा पूर ओसरला

- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात गोदावरीची पाणीपातळी घटली

- गंगापूर सद्यस्थितीत सुरूय १४४२ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग

- रामकुंड, गोदाघाट परिसरातील जवजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात

WASHIM : शेतात पाणी साचल्याने कापसाची वाढ खुंटली, बोंडही कुजली

वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशी पिकावर मोठा परिणाम झाला आहे,कपाशीचे शेकडो एकर क्षेत्र पावसाच्या पाण्यात बुडाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने झाडांची वाढ खुंटली असून, कापसाच्या बोंडांवर कुज येण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभी केलेली पिके अक्षरशः डोळ्यांसमोर नष्ट होताना दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. आधीच सोयाबीन पिकाला आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा सहन केलेल्या शेतकऱ्यांना कपाशीतील नुकसानामुळे दुहेरी फटका बसला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पन्नाचे गणित कोलमडले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणार नाही.

जालन्यातील भोकरदनमध्ये द ग्रँड गरबा नाईट 2025 उत्साहात संपन्न,भर पावसात सुद्धा महिलांची मोठ्या प्रमाणावर हजेरी

जालन्यातील भोकरदन शहरात एक दिवसीय नवरात्र गरबा उत्सवाच आयोजन करण्यात आल होत. जालन्यातील भोकरदन शहरात सकाळ माध्यम समूह आणि समृद्धी गार्डनच्या पुढाकाराने गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गरबा कार्यक्रमात नृत्यासोबतच, लाइव्ह डीजे गरबा, आकर्षक बक्षिसे, फूड स्टॉल्स, संगीत आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम लहान मुलांसाठी स्वतंत्र मनोरंजन व्यवस्था करण्यात आली होती.महाविद्यालयीन तरुणी तसेच शहरातील महिलांनी या कार्यक्रमाचा पारंपारिक गरबा पोशाखामध्ये सहभाग नोंदवला.

सावित्रीच्या लेकींना आज मिळाल्या सायकली, पाच किलोमीटरची पायपीट थांबली. नवरात्र उत्सवात केला सावित्रीच्या लेकींचा सायकल देऊन सन्मान....

मावळच्या दिवड येथील श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील एकवीस सावित्रीच्या लेकींना नवरात्र उत्सवात सायकलींचे वाटप करून गौरविण्यात आले आहे.. नवरात्र उत्सवात कुमारिका पूजन मोठ्या प्रमाणात केले जाते.

हाच धागा धरून युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यावतीने मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले.. मावळ तालुक्याचं शेवटच टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय ग्रामीण भागातील गाव म्हणजे दिवड. या गावात संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय असून पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळेत सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अतिशय ग्रामीण भाग असल्यामुळे युनियन बँकेच्या ही बाब लक्षात आली त्यांनी आठवी आणि दहावी मध्ये शिकणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्याचं निर्णय घेतला... दरम्यान सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर वेगळेच आनंद बघायला मिळालं. रोज पाच ते सहा किलोमीटर पायपीट करत शाळेत आम्ही जात होतो. मात्र सायकल मिळाल्यामुळे येण्या-जाण्याचा प्रश्न सुटला असून वेळ वाचणार आहे. आम्ही तो वेळ अभ्यास करण्या करिता आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे... या कार्यक्रमाला युनियन बँकेचे व्यवस्थापक, ग्रामस्थ, शिक्षक, यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते..

Maharashtra Live News Update: शेतकरी संकटात असताना बँकेकडून कर्ज वसुलीसाठी तगादा

शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा

कळंब तालुक्यातील संचितपुर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतीच मोठ नुकसान झालेलं असताना बँकांकडून वसुली सुरूच

संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याने शेतकरी संकटात

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संचितपुर गावातील शेतकऱ्यांची मागणी

नवी मुंबई युवा सेनेच्या माध्यमातून अतिवृष्टी झालेल्या भागांना 50 हजाराची निधी उपमुख्यमंत्र्यांकडे सपूर्त

राज्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असल्यामुळे राज्यातला शेतकरी अडचणी सापडला आहे या निमित्ताने नवी मुंबई युवा सेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईच्या युवा सेनेच्या माध्यमातून 50 पाच हजार रुपयांची ओला दुष्काळासाठी निधी सपूर्त केला आहे

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

भीमा आणि नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून सोमवारी दुपार पासून भीमानदी पात्रात तब्बल एक लाख 25 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी पंढरपुरात चंद्रभागा इशारा पातळीवरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे.

Solapur : रस्ता दुरूस्तीसाठी कान्हीपुरातील आजी माजी सरपंचाचे खड्ड्यात बसून आंदोलन

मागील एक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करावे यामागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरीतील येथील आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्डयातील पाण्यात बसून ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरु न केल्यास संबंधीत ठेकेदाराच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल , असा इशारा येथील माजी सरपंच प्रेम चव्हाण यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 3 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या कामाचे निविदाही पूर्ण झाली आहे. परंतु संबंधीत ठेकेदाराने मागील एक वर्षापासून काम सुरु केले नाही. रखडलेले काम ताडीने सुरु करावे यामागणीसाठी आज येथील आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यानीच रस्त्यावर पडलेल्या खड्यामधील पाण्यात बसून ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

MUMBAI | मुंबई पालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला होणार जाहीर

सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना जाहीर घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभाग रचना ६ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी १ जुलैपर्यतची मतदार यादी ग्राह्य धरणार आहे. पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती, सूचना मागविल्या होत्या. यावर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती सूचना मागविल्या होत्या. 

AKOLA : कीटकनाशक फवारणी विषबाधेने तरुणाचा मृत्यू

कीटकनाशक फवारणी विषबाधेने तरुणाचा मृत्यू... शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने झाली होती विषबाधा. वडनेर गंगाई येथील या तरुण शेतकऱ्याचा. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 'गणेश ज्ञानेश्वर कात्रे' असं या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. 

Maharashtra Live News Update: नगर हिंसाचार प्रकरण, ३९ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नगर शहरात काल झालेल्या रास्तारोको नंतर दगडफेकीच्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

जवळपास दोनशे जणांवर गुन्हा दाखल....

 पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन केला गुन्हा दाखल...

रस्ता रोको दरम्यान जमावाने केलेल्या दगडफेकीत सात पोलिस कर्मचारी जखमी...

पोलिसांनी आत्ता पर्यंत घेतले 39 जणांना ताब्यात...

दरम्यान जमावाने तोडफोड आणि रिक्षांच्या काचा फोडल्याचा नवीन व्हिडिओ समोर...

JALANA | जालन्यातील गोदाकाठच्या 26 गावातील जवळपास आठ हजार नागरिकांचे स्थलांतर...

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्राशेजारील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. जालन्यातील गोदाकाठच्या 26 गावातील जवळपास आठ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं.जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

NANDED | गरबा चालवायचा असेल तर दहा हजार हप्त्याची मागणी करत केली तलवारीने मारहाण

गरबा चालवायचा असेल तर आम्हाला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत डेकोरेशन व्यावसायिकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणात वजीराबाद पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.पोलिसांनी या तिन्ही आरोपींची घटनास्थळी नेऊन धिंड काढली.नांदेड शहर आणि जिल्ह्यात सध्या नवरात्र महोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला आहे अनेक ठिकाणी दांडिया, गरबा महोत्सव सुरू आहेत. याच महोत्सवादरम्यान शहरातील व्यंकटेशनगर येथे जय दुर्गामाता महोत्सवात 25 सप्टेंबर रोजी  वैभव गुरव या डेकोरेशन व्यावसायिकास तुला गरबा चालवायचा असेल तर आम्हाला रोज दहा हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अन्यथा जिवे मारू अशी धमकी दिली.गुरव यांच्यावर तलवारीने वार देखील करण्यात आले.या प्रकारानंतर वजीराबाद पोलिसांनी या तीन आरोपींना अटक केली आणि त्यांची धिंड काढली.

Khed चिमुकल्या मुलीवर कुत्र्याच्या टोळीचा हल्ला

चिमुकली मुलगी खाऊची पिशवी घेऊन घराकडे जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर झडप घातली. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली. यावेळी चिमुकलीने आरडाओरड केल्याने पालकांनी तात्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र गावात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.

PUNE | मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

पोलिसांनी धाड टाकत केली पिडीत महिलांची सुटका

पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरातील मसाज पार्लर वर पोलिसांचा छापा

खराडी भागातील SUN SHINE SPA वर पोलिसांनी केली कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांना मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा चालक, व्यवस्थापक यांचा वर गुन्हा दाखल केला

PUNE | पुणे मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर होणार आजपासून कमी

पुणे मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर होणार आजपासून कमी

२७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर पर्यंत राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता

३० सप्टेंबर नंतर पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे

राज्यातील जिल्ह्यांना आज कुठल्याही प्रकारचा "अलर्ट" नाही

काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित

PUNE | पुणे शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर झाला कमी

पुणे शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर झाला कमी

पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर सुद्धा पाऊस थांबला

पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाची विश्रांती

समाधानकारक पाऊस झाल्याने पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे चार ही धरणात १०० टक्के पाणीसाठा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर मध्ये १०० टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील ४ ही धरणे मिळून २९ टी एम सी पाणीसाठा

Maharashtra Live News Update: कोयना परिसराला भुंकपाचा धक्का, मध्यरात्री नागरिकांची धावपळ

कोयना परिसराला भुंकपाचा धक्का 

रात्री 12 वाजून 9 मिनिटांनी बसला सौम्यधक्का

3.4 रिश्टर स्केलचा सेमी धक्का 

कोयनानगरपासून चार किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू 

भूंकपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी नाही

BULDHANA : खडकपूर्णा नदीला आलेल्या पुरामध्ये काही माकडे गेली वाहून...

खडकपूर्णा प्रकल्प 100 टक्के भरला असल्याने धरणाचे 19 दरवाजे उघडले असून नदीपात्रात  मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीला पूर आला आहे.. अश्यातच नदी पात्राच्या काठावर असलेल्या बांबूच्या झाडावर 15 ते 20 माकडे बसलेली होती अचानक नदीला पूर आला व ते सर्व माकडे पाण्यात पडली.. आणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने शेवटी माकडे वाहून गेलीत......

KHED | दोन एसटी बसचा अपघाताचा थरार डोळ्यासमोर अनुभवला

कडुस कोहिंडे रोडवर दोन एसटी बसचा समोरासमोर धडकीचा अपघाताचा थरार प्रवाशांसह महाविद्यालयील विद्यार्थ्यांनी अनुभवला यावेळी एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत एसटी बाजुला घेतल्याने मोठ्या अपघाताचा प्रसंग टळला यावेळी दोन एसटी बस ग्रामीण भागातील रस्त्यावर धावताना भरधाव वेगाने धावत होत्या यावेळी एकमेकांना कट मारण्याच्या नादात हा भिषण अपघात झाला यावेळी प्रवाशांनी अपघाताचा थरार डोळ्यासमोर अनुभवल्याने आता एसटी बसचा प्रवासही सुखरुप नसल्याची भावना व्यक्त केलीय

BEED : : धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्थान नारायण गडावरील मनोज जरांगे यांचा परंपरेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात होणार.

मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने यंदा श्रीक्षेत्र नारायण गडावरील मनोज जरांगे पाटील यांचा होणारा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे साधा पद्धतीने असणार आहे. या मेळाव्याची तयारी नारायण गडावर पूर्ण होतेय.. मागील वर्षी नारायण गडावर भव्य स्वरूपात मेळावा झाला.. मात्र सध्या शेतकरी अडचणीत असल्याने हा मेळावा साध्या पद्धतीने होईल आणि नारायणगड स्वतः हा दसरा मेळावा घेत आहे. तर पूरग्रस्तांना देखील मदत केली जाणार आहे..

YAVATMAL : पूरग्रस्तांसाठी 27 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

राज्यामध्ये पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालाय त्यामुळे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना 27 लाख 11 हजार रुपयांचा निधीचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या नावे देण्यात आलाय. यावेळी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वीर शहीद जवान पत्नी सुनीता प्रकाश हिरे यांना मुख्यमंत्र्यांनी जमिनीचा पट्टा वाटप सुपूर्द केला

DHARASHIV : धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका

धाराशिव जिल्ह्यातील काजळा गावात मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आल्यामूळे शेतकऱ्याच्या दुपत्या गायी वाहून गेल्याने पशुधनाचे नुकसान झालय.काजळा आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासह इतर पिकांचे ही मोठं नुकसान झाले असून नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून तर शिवारातील लहान मोठे रस्ते ही वाहून गेल्याने शेती पुन्हा कशी पूर्ववत करायची हा शेतकऱ्यापुढे प्रश्न उभा टाकलाय. पुलाची उंची कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी आता गावकऱ्यांमधून केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com