sanjay Raut-Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : संजय राऊत बोलले, विरोधक उद्धव ठाकरेंवर घसरले; म्हणाले, किमान FB लाइव्ह करून तरी...

संजय राऊतांच्या वक्तव्याशी ठाकरे सहमत नसतील तर त्यांनी राजीनामा घ्यावा, असे ते म्हणाले.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Sanjay Raut Statement Row : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण पेटलं आहे. याच मुद्द्यावरून आता भाजपनं थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  संजय राऊत  यांच्यावर तोफ डागताना, उद्धव ठाकरेंवरही नेम धरला. संजय राऊत जे बोलतात, ते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मान्य असते. ते सामनामधून जे लिहितात, त्याला त्यांची मान्यता असते. त्यामुळं संजय राऊत जे बोलले ते उद्धव यांना मान्य आहे का? यावर सगळे पक्ष बोलले, पण ते का बोलत नाहीत? असा खडा सवाल बावनकुळे यांनी केला.

राऊत यांचा राजीनामा घ्यावा!

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. संजय राऊतांनी खासदारपदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप आणि शिवसेनेकडून केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याशी ठाकरे सहमत नसतील तर त्यांनी राजीनामा घ्यावा, असे ते म्हणाले.  (Political news)

इतर वेळेला पत्रकार परिषद घ्यायला ठाकरे तत्पर असतात. पण आज ते का बोलत नाहीत? विरोधी पक्ष जो हक्कभंग आणेल, त्याबाबत समिती ठरवेल. हक्कभंग समिती जी कारवाई करायची ती करेलच, पण उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी. किमान फेसबुक लाइव्ह करून तरी भूमिका स्पष्ट करावी, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

आदित्य ठाकरेंनाही आव्हान

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंनाही (Aaditya Thackeray) आव्हान दिले. आदित्य ठाकरेंनी समोर येऊन बोलावे. १२ कोटी जनतेच्या मतांचा अपमान झाला आहे. संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे. ते कारागृहात राहून आले आहेत, त्यामुळे त्यांना माफी मागण्याची सवय नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Edited By - Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT