akola news  Saam tv
महाराष्ट्र

अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; भाजपच्या उमेदवाराला काँग्रेस आणि MIM चा पाठिंबा?

akola politics : अकोल्यातील हिरवखेड नगरपरिषदेत भाजपच्या उमेदवाराला काँग्रेस आणि एमआयएमने पाठिंबा दिला आहे. या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक

सूचकामध्ये काँग्रेसचे नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचं नाव.

तर आजम खान सुभेदार खान हे एमआयएमचे एकमेव नगरसेवक

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून महिला उमेदवार म्हणून अनिता वाकोडे आहे. त्यांच्या नामनिर्देशित अर्जाच्या सूचकामध्ये काँग्रेसचे नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान आहे. तर एमआयएमचे नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचं नाव अनुमोदक म्हणून आहे. त्याचे पुरावे देखील समोर आले आहेत.

एमआयएम'कडून अनुमोदक आणि काँग्रेसकडून सूचकाचं भाजपच्या उपसपाभाती पदाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रात नावे असल्याने मोठी चर्चा याची आहे. अखेर या प्रकारानंतर विरोधकांना मोठं तोंड फुटलं आहे.

भाजपच्या उमेदवाराला एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकाचा अनोखा पाठिंबा?

हिवरखेड नगर परिषदच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका आज 20 जानेवारी रोजी पार पडल्या. यात भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सूचक आणि अनुमोदन दिल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

हिवरखेड नगरपरिषदच्या आरोग्य सभापती पदी वदना राजेश वानखडे, बांधकाम सभापती पदी वैभव गावंडे आणि पाणीपुरवठा सभापती पदी अजीज खा जमीर खां, महिला व बालकल्याण सभापती पदी प्रमिला रविंद्र मानकर, नियोजन व विकास समिती पदासाठी प्रमिभा वीरेंद्र येऊल यांची निवड करण्यात आली. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाकरीता भाजपच्या अनिता वाकोडे यांनी अर्ज भरला. परंतु भाजपच्या उमेदवाराला लागणारे सूचक म्हणून काँग्रेसच्या रुबीनाज अब्दुल सलमान यांनी तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे नगरसेवक आजम खान यांनी सह्या दिल्याने मोठी चर्चा झालीय. त्यामुळं आता महाराष्ट्रात विविध पक्षांच्या युती आणि आघाडी कोण कुणासोबत करेल याचा नेम नाही.

हिवरखेड नगरपालिका पालिका पक्षीय बलाबल :

सत्ता राखली : भाजप

नगराध्यक्ष विजयी उमेदवार : सुलभा दुतोंडे

एकूण जागा : 20

पक्षीय बलाबल :

भाजप : 11

शिंदेसेना : 05

काँग्रेस : 02

वंचित : 01

एम़आयएम : 01

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT