Anil Bonde banner saam tv
महाराष्ट्र

RajyaSabha Elections: : मतमोजणीपूर्वीच भाजपच्या अनिल बोंडेंचे विजयाचे बॅनर झळकले

राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या भुवया उंचावणारी घडामोड समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून राजकीय मैदानात धुरळा उडवणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha election) मतदानाची प्रक्रिया आज शुक्रवारी पूर्ण झाली. महाविकास आघाडीसह भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात डावपेच आखले. आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले.त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. परंतु, भाजपने (BJP) ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे मतमोजणीला विलंब झाला आहे. परंतु, आता राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या भुवया उंचावणारी घडामोड समोर आली आहे.

राज्यसभेच्या मतमोजणीपूर्वीच भाजप उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या विजयाचे बॅनर भाजपच्या समर्थकांनी लावले आहेत. तिवसा व गुरूंकुज मोझरी येथे किसान मोर्चाच्यावतीने अनिल बोंडे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत. त्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने विजयाचा आत्मविश्वास दाखवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अमरावतीच्या किसान मोर्चाकडून अभिनंदन, अशा आशयाचा बॅनर भाजप नेते नरेंद्र राऊत यांनी लावला आहे. या बॅनवर भाजपच्या दहा कार्यकर्त्यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. दरम्यान, निकालापूर्वीच भाजपने बोंडे यांचा विजयाचा बॅनर लावून विजयाचा आत्मविश्वास दाखवला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

Shruti Marathe: मोकळे केस अन् गालावरची गोंडस खळी...

SCROLL FOR NEXT