Assembly Election Rediff mail
महाराष्ट्र

Assembly Election: भाजप-अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये खडाजंगी; महायुतीत वादाची ठिणगी?

Assembly Election: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजप आणि अजित पवार गटातील आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे विधानसभेत महायुती राहणार की नाही यावर बाबत शंका उपस्थितीत होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुक तोंडावर आली असतानाच आता महायुतीतील खदखद समोर येण्यास सुरुवात झालीय. कारण अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यातच त्यांच्या पक्षाचे आमदार आणि भाजप नेत्यांमधील वाद टोकाला गेले आहेत. अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडेंच्या पिंपरी मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय.

विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात भाजपच्या आमदार उमा खापरेंनी ठरावच केलाय. त्यामुळे आता भाजपच्या मतदारसंघांवरही दावा सांगणार असल्याचा इशारा अण्णा बनसोडेंनी दिलाय. त्यामुळे पिंपरीत महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय.

पिंपरीतली ही धुसफूस कमी आहे की काय तिकडे मावळमध्ये महायुतीत रण पेटलंय. भाजप पदाधिकारी अजित पवारांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याचा अपप्रचार करत असल्याचा आरोप दादांचे आमदार सुनील शेळकेंनी केलाय. त्यामुळे विधानसभेला मावळमधील भाजपचे पदाधिकारी तुतारीचा प्रचार करणार असल्याचा खळबळजनक आरोप सुनील शेळकेंनी केलाय. तर महायुतीच्या उच्चस्तरीय बैठकीत विसंवाद टाळण्याविषयी बोलणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या विरोधात उघड भूमिका घ्यायला सुरुवात केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महायुतीत वाद होऊ देऊ नका अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यानंतरही अनेक मतदारसंघामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमधले वाद चव्हाट्यावर येत आहेत. अमित शाहांच्या दौ-यात यावर तोडगा काढण्याचं आव्हान आहे. त्यामुळे हे वाद शमवण्यात महायुतीला यश येणार की याची विधानसभा निवडणुकीत किंमत मोजावी लागणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT