Dhule Lathicharge Saam Tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांनी गर्दी पांगवण्याठी केला लाठीचार्ज

Latest News: पोलिसांनी (Dhule Police) कार्यकर्त्यांच्या गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. सध्या मतदान केंद्राबाहेर गोंधळाचे वातावरण आहे.

Priya More

Dhule News: धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dhule Krushi Utpanna Bazar Samiti) निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान सुरु असताना मतदान केंद्राबाहेर (Polling Station) कार्यकर्त्यांचा राडा झाला. यावेळी पोलिसांनी (Dhule Police) कार्यकर्त्यांच्या गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. सध्या मतदान केंद्राबाहेर गोंधळाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानादरम्यान राडा झाला आहे. मतदान केंद्राबाहेर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी करत राडा घातला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राडा घातला. मतदान केंद्राबाहेर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी सुरुवातीला या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

पण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाल्याचे लक्षात येता सकाळपासून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी कार्यकर्त्यांची ही गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिसांनी भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळे मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशामध्ये सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या शांततेत मतदान सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT