bjp  Saam tv
महाराष्ट्र

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

nagpur politics : राजकारणात निष्ठा आणि शिस्तीला सर्वाधिक महत्त्व असतं. पण नागपूर भाजपनं 'पक्षशिस्त' म्हणजे काय हे थेट नवनिर्वाचित नगरसेवकांचा राजीनामा घेऊन अधोरेखित केलयं... 102 नगरसेवकांचे राजीनामे नेमके का घेण्यात आले? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नागपूर महापालिकेत भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखलेलं असताना पक्षनिष्ठेसाठी नवा वस्तुपाठच घालून दिलाय...भाजपचे गटनेते नरेंद्र बोरकर यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या 102 नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केलेत... मात्र महापौरनिवडीआधीच भाजपनं आपल्याच नगरसेवकांचे राजीनामे का घेतले पाहूयात...

कोणताही नगरसेवक पक्षविरोधी भूमिका घेणार नाही यासाठी तसचं नगरसेवकांचे वर्तन जनमानसात पक्षाची प्रतिमा मलीन करणारे नसावे यासाठी राजीनामे आधीच लिहून घेतले जातात.. इतकचं काय तर शिस्तभंग झाल्यास कायदेशीर प्रक्रियेची वाट न पाहता तात्काळ राजीनाम्याचा निर्णय घेता यावा म्हणून पक्षानं राजीनाम्याचा निर्णय घेतलाय...

दरम्यान संघाचं मुख्यालय असलेलं नागपूर हे भाजपचा बालेकिल्ला मानलं जातं... त्यामुळे इथं पक्षशिस्त, जबाबदारी आणि संघटनात्मक नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे.. अशातच भाजपनं 21 आणि 24 वर्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांचेही राजीनामे लिहून घेतलेत.. त्यामुळे ही काही नवीन बाब नाही... नागपुरात 1997 पासून जेव्हा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नगरसेवक झाले होते, तेव्हापासून हे राजीनामा सत्र असेच सुरु आहे...

नागपूर भाजपचा हा 'राजीनामा पॅटर्न' राज्यातील इतर राजकीय पक्षांसाठी एक धडा ठरू शकतो. सत्ता असो वा नसो, संघटनेवरची पकड ढिली होऊ नये, हाच संदेश यातून दिला गेलाय. आता या शिस्तीचा फायदा नागपूरच्या विकासकामांत किती होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : शेगाव येथील चिंचोलीजवळ शेतातील चारा कुटाराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Summer Skin Care: उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरावे? खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Long Hair Tips: 1 महिन्यातच केस दुपटीने वाढतील, रोज रात्री कांदा आणि नारळाचा 'हा' तेल लावा

जम्मू-श्रीनगर आता फक्त काही तासांत! वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ, कसा असणार मार्ग आणि वैशिष्ट काय?

Shahajiraje Movie: स्वराज्याच्या पाया रचणाऱ्या शूर योद्ध्याची कहाणी; महाराष्ट्र दिनी 'शहाजीराजे' चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT