Niranjan davkhare sends letter to cm eknath Shinde
Niranjan davkhare sends letter to cm eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

राज्यातील नव्या महाविद्यालयांना १५ जुलैपूर्वी मंजुरी द्यावी, डावखरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रामनाथ दवणे

मुंबई : राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० नवीन महाविद्यालयांचे (New Colleges) प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आले आहेत. या प्रस्तावांना विद्यापीठ अधिनियमानुसार १५ जुलैपूर्वी मान्यता मिळणे गरजेचे आहे. विद्यापीठ अधिनियम लक्षात घेता, या महाविद्यालयांच्या (college proposal permission) प्रस्तावांना मान्यता द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयांना तात्काळ मान्यता देण्याची गरज असल्याचे आमदार डावखरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

राज्य सरकारने नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार राज्यभरातून ४५० नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. विद्यापीठ अधिनियमानुसार नव्या महाविद्यालयांना १५ जुलैपूर्वी मान्यता द्यावी लागते. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश सुरू झाले आहेत.

मात्र, सरकारची मान्यता न मिळालेल्या महाविद्यालयांना प्रवेश देता येत नाहीत. त्यामुळे त्या भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. येत्या १५ जुलैपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या महाविद्यालयातील पात्र ठरलेल्या महाविद्यालयांना मंजुरी मिळाल्यास, त्या भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येणार नाहीत, याकडेही आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्याची आवश्यकता होती. त्यातून संस्थाचालकांबरोबरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असता. महाविद्यालयाचे अनेक पर्याय विद्यार्थी व महाविद्यालयांपुढे उपलब्ध झाल्याने प्रवेश सुकर होईल. त्यासाठी नव्या महाविद्यालयांना १५ जुलैपर्यंत मान्यता देण्याची गरज आहे, असे मत भाजपाच्या शैक्षणिक प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक सचिन बी.मोरे यांनी व्यक्त केले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

SCROLL FOR NEXT