Satara News, Satara police News saam tv
महाराष्ट्र

Satara News : कास, ठाेसेघरला निघालात? थांबा ! पुढं पाेलिस आहेत... 'बुलेट राजा' सह धूम स्टाईलवर नजर, 'यांचा' हाेणार सन्मान

अपघातग्रस्तांना नागरिकांनी तात्काळ मदत करावी असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

Siddharth Latkar

Satara Police News : फटाके फोडल्यासारखे आवाज करत जाणा-या साता-यातील बुलेट राजांविरोधात सातारा वाहतुक शाखेच्या पाेलिस कर्मचा-यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पाेलिसांनी आत्तापर्यंत 125 वाहनधारकांवर कारवाई केली आहे. परिणामी कानठळ्या बसवणारा आवाज काढणात बुलेट पळविणा-यांवर जरब बसण्यास मदत झाली आहे. (Maharashtra News)

सातारा जिल्हयामध्ये मागील 15 दिवसांपासून पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस दलामार्फत हॉर्न व सायलेन्सर मध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करणेत येत आहे.

दंडात्मक कारवाई केले नंतर वाहन चालक हे स्वतःहुन असे हॉर्न व सायलेन्सर काढून टाकत आहेत. या मोहिमेत जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा सातारा, वाहतुक नियंत्रण शाखा सातारा शहर, वाहतुक नियंत्रण शाखा कराड शहर व जिल्हयातील सर्व पोलीस (police) ठाणेकडील वाहतुक पोलीस अंमलदार सहभागी झालेले आहेत.

आजपर्यंत 125 वाहनांवर कारवाई करणेत आलेली. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार आहे. इतरांना त्रास होईल अशा प्रकारचे हॉर्न व सायलेन्सर लावुन वाहने चालवु नयेत. अशा प्रकारे बदल केला असल्यास हॉर्न व सायलेन्सर स्वतःहुन काढुन टाकावेत.

व्यावसायिकांनी सहकार्य करावे

नागरिकांनी वाहन पार्किंग करताना तसेच किरकोळ व्यवसायिकांनी त्यांचा व्यवसाय करताना रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा त्यांचेवर कायदेशिर कारवाई करणेत येईल असा इशारा सातारा (satara) जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आला आहे.

अपघातग्रस्तांना मदत करणा-यांचा हाेणार सन्मान

एखादा अपघात झालेनंतर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करावी असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. अशा मदतीमुळे एखाद्या व्यक्तिचा मृत्यु टाळण्यास मदत होईल.

मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलीस चौकशीसाठी कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याबाबत दक्षता पोलीस दलातर्फे घेण्यात येईल व अशा व्यक्तींचा यथोचित सन्मान करणेत येईल असे पाेलिस दलाने नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT