Akola news Saam tv
महाराष्ट्र

Akola Election : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा हादरा; काँग्रेसने 65 वर्षांची सत्ता उलथवली

Akola Politics : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने खतिब कुटुंबाची 65 वर्षांची सत्ता उलथवली आहे.

Vishal Gangurde

अकोल्यातील बाळापूरची राज्यभरात चर्चा

बाळापूर नगपरिषद निवडणुकीत आंबेडकरांना हादरा

काँग्रेसने खतीब कुटुंबाची ६५ वर्षांची सत्ता उलथवली

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यातील नगरपरिषदांची निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अकोल्यातील ६ नगरपरिषदांपैकी बाळापूर नगपरिषदेवर लोकांचं विशेष लक्ष लागलं होतं. बाळापूर नगरपरिषदेच्या निकालाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने बाळापूरमध्ये खतीब कुटुंबाच्या ६५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये काँग्रेसने खतीब 65 वर्षांची सत्ता लोकांनी उलथवली. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या डॉ. आफरीन 1711 मतांनी विजयी. वंचितच्या उमेदवार रजियाबेगम खतिब यांचा पराभव केला. माजी आमदार नातिकोद्दीन खतिब यांच्या खतीब घराण्याची चार पिढ्यांपासून बाळापूरवर सत्ता होती.

अकोल्यातील तेल्हारामध्ये प्रहारचे 5 नगरसेवक विजयी

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपालिकेत बच्चू कडू यांच्या प्रहारचे 5 नगरसेवक विजयी झालेत. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली होती. तेल्हारामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली. तेल्हारा नगरपालिकेत 13 जागांसह भाजपची सत्ता होती. भाजपच्या वैशाली पालीवाल नगराध्यक्षपदी विजयी झाले. तेल्हारा नगरपालिकेत भाजपने सत्ता राखली.

अकोला जिल्ह्यातील नरगरपरिषदांमध्ये कोण विजयी?

1) अकोट : एमआयएम : फिरोजाबी राणा : आघाडी

2) हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी

3) मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी

4) बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : विजयी

5) तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल : विजयी

6) बार्शीटाकळी नगरपंचायत : वंचित : अख्तरा खातून : विजयी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT