suresh warpudkar ZP Election news  Saam tv
महाराष्ट्र

ZP Election : माजी मंत्र्याला मोठा धक्का; कुटुंबातील ५ पैकी ४ पराभूत, मतदारांनी घराणेशाही नाकारली

suresh warpudkar ZP Election news : भाजपच्या माजी मंत्र्याला मोठा धक्का बसला आहे. वरपुडकर कुटुंबातील ५ पैकी ४ जण पराभूत झाले आहेत.

Vishal Gangurde

जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांना मोठा धक्का बसलाय

कुटुंबातील ५ पैकी ४ उमेदवारांचा पराभव झालाय

मतदारांकडून घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचं चित्र

महापालिका निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही नाकरल्याचं पाहायला मिळालं होतं. नांदेड महापालिका आणि बदलापूर नगरपरिषदेत बड्या नेत्याच्या कुटु्ंबातील उमेदवारांना मतदारांनीच धूळ चारली होती. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही मतदारांनी घराणेशाही नाकारल्याचे दिसून येत आहे. परभणीतील माजी मंत्री वरपुडकर यांच्या कुटुंबातील ५ पैकी ४ जण पराभूत झाले आहेत. कुटुंबातील ४ जणांचा पराभव हा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

परभणीचे भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच सदस्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे होते. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाकडून मैदानात उतरल्या होत्या. सोनल देशमुख यांचा पराभव भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी केला आहे.

वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते. तिथे ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकर यांचा पराभव केला आहे. सून प्रेरणा वरपूडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून रिंगणात उभ्या होत्या. या गटात काँग्रेसच्या ज्योत्नना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे वरपुडकर यांचे घरातील तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत.

दुसरीकडे लोहगाव जिल्हा परिषद गटात दोन पुतणे उभे होते. त्यातील काँग्रेसच्या चिन्हावर उभे असलेले अजित वरपूडकर यांनी भाजपकडून या निवडणुकीत ऐश्वर्य वरपूडकर यांचा पराभव केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या गोटमार यात्रेत अनेक जण गंभीर जखमी

Rajya Sabha Elections: भाजपकडून 9 उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाले तिकीट? वाचा यादी

Holi 2026 : होळीचा रंग गेला, पण त्वचा अजून निस्तेज दिसतेय? मग 'हा' घरगुती उपाय करा, चेहरा नव्याने चमकेल

धुळवडीच्या दिवशी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर; माजी केंद्रीय मंत्र्यांचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT