CM Eknath Shinde Onion Price News Saam TV
महाराष्ट्र

Onion Price News: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

Eknath Shinde On Onion Price: गेल्या काही दिवसांपासून कांदा, भाजीपालासह इतर शेतीमालाच्या भावात मोठी घसरण होत आहे.

Satish Daud

Onion Farmer News: गेल्या काही दिवसांपासून कांदा, भाजीपालासह इतर शेतीमालाच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापला असून सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या (Onion Price) दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. अशातच सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती.

समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला KISS करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

SCROLL FOR NEXT