Eknath Shinde And Uddhav Thackeray Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Operation Tiger: पुन्हा काय झाडी, काय डोंगर... ठाकरेंच्या त्या खासदारांना दिल्लीतून तडकाफडकी हलवलं, आता कुठं?

Maharashtra Politics Heats Up: ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या खासदारांना दिल्लीतून हलवण्यात आले आहे.

Priya More
  • महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ

  • ठाकरे गटाच्या खासदारांना दिल्लीतून गुप्त ठिकाणी हलवण्यात आले

  • ऑपरेशन टायगरमुळे शिंदे-ठाकरे संघर्ष तीव्र झाला

  • काही खासदारांनी शिंदे गटात जाण्यास स्पष्ट नकार दिला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या खासदारांना दिल्लीतून हलवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व खासदारांना उत्तर भारतातील एका राज्यात पाठवल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व खासदार १९ जूनला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर ओमराजे निंबाळकर पुण्यात दाखल झाले आहेत.

ज्यावेळी आमदार फुटले होते तेव्हा त्यांना गुवाहाटीला नेण्यात आले होते. यावेळी मात्र खासदारांना गुवाहाटी नाही दुसऱ्या राज्यात नेण्यात आले आहे. ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत. तर इतर सर्व खासदारांना दुसऱ्या राज्यात हलवण्यात आले आहे. याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. १९ जूनला शिवसेनाचा वर्धापन दिन आहे. त्यादिवशी या सर्व खासदारांना मुंबईत आणण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या ९ लोकसभा खासदारांपैकी ६ खासदार पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. यामधील आणखी दोन खासदारांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील यांच्याव्यतिरिक्त अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे देखील उद्धव यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, 'मी उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहीन. माझा इतर कोणाशीही संपर्क नाही. मला शिंदेजींकडून कोणताही फोन आलेला नाही. त्यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केलेला नाही. मी नाराज नाही आणि शिवसेनेसोबतच आहे. एका समितीच्या बैठकीसाठी मी दिल्लीत आलो आहे.' तर संजय दिना पाटील यांनी देखील स्पष्टपणे सांगितले की, 'मी कुठल्याही पक्षात चाललो नाही. उद्यापर्यंत सर्वकाही कळेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT