Pune Police Sangamner Action  Saam TV
महाराष्ट्र

Sangamner News: पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; संगमनेरमधील क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त

Pune Big Action: पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्धवस्त केला आहे.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही संगमनेर

Pune Police Sangamner Action

पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडल्याची घटना ताजी असतांनाच आता केमिकल ताडी तयार करणाऱ्या रॅकेटचा देखील पर्दाफाश केलाय. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्धवस्त केला आहे. तेथून तब्बल दोन हजार तीनशे किलो(2300 KG) क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल ) जप्त करण्यात आलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याची किंमत 60 लाख रुपयांच्या घरात आहे. तसेच तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सर्वात गंभीर म्हणजे सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवित होता. (Latest Marathi News)

शहरात ताडीच्या संदर्भात कारवाई केल्यानंतर त्याचा तपास करत असताना केमिकलपासून ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेट केमिकल संगमनेर मधील वेल्हाळे गावातून पुरवठा होत असल्याचे समोर आले.

त्यानुसार गुन्हेशाखेने थेट वेल्हाळे गावात धडक देवून छापा टाकला. एक किलो क्लोरल हायड्रेट पावडरपासून तब्बल दोनशे लिटर ताडी तयार केली जात होती. राज्यात पुणे पोलिसांनी केलेली अद्यापर्यंतची ही सर्वांत मोठी तसेच केमिकल (CH) कारखाना उद्धवस्त केल्याची पहिलीच कारवाई असल्याचे समजते.

तीन दिवस विशेष मोहिम राबवून गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. क्लोरल हायड्रेट केमिकलपासून तयार केलेली ताडी पिल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या रॅकेटची माहिती मिळाली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार , सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT