Auto Rickshaw Drivers meta ai
महाराष्ट्र

Auto Rickshaw Drivers : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महत्वाची बातमी, मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत वाढ नाही, १८ ऑगस्टपासून कारवाई

Maharashtra News : महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची अतिरिक्त मुदत वाढवून देण्यात आल्याची माहिती आहे. मुदत संपल्यानंतर मराठी ज्ञान नसल्यास परवान्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

रिक्षाचालकांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातल्या ऑटो - रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मराठी भाषा शिकण्याची 15 ऑगस्ट शेवटची मुदत असणार, मुदत वाढ मिळणार नाही, 18 ऑगस्टपासून कारवाई केली जाणार, कुणी कुणाला भेटले तरी मुदतवाढ़ मिळणार नाही, मराठीचा अवमान केला तर चालणार नाही, निर्णयावर पुर्नविचार करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाठींबा दिला आहे. जीआरमध्ये एक वाक्य आहे, त्याला एक महिन्याची मुदत दिली जाणार, त्यानंतर शिकला नाही तर लायन्सस रद्द केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आता आणखी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. याआधी १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली होती. पण या कालावधीत मराठीचे आवश्यक ज्ञान मिळवता न आलेल्या चालकांना आता अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

रिक्षाचालकांना आता १ महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. या वाढीव मुदतीत चालकांनी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान मिळवणं अपेक्षित आहे. यामध्ये प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे मानले जात आहे.

वाढीव मुदत संपल्यानंतरही संबंधित चालकांना मराठीत बोलता येत नसेल, तर त्यांच्या परवान्यावर कारवाई शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. हा नियम ज्यांनी मोहीमेत सुरुवातीपासून सहभाग घेता आला नाही त्यांच्यासाठी लागू असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT