पीएम मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील १२ आमदारांचा परदेश दौरा रद्द
राहुल नार्वेकरांनी जपान दौरा रद्द करण्याचा घेतला निर्णय
इंधन बचतीसाठी सरकारचे महत्वाचे पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्याचे तंसच परदेशात फिरायला जाण्याचे एका वर्षासाठी पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. पीएम मोदी यांच्या आवाहनानंतर राज्य सरकारकडून वेगवेगळे महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. विधीमंडळाचे १२ आमदार जपान दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांचा प्रस्तावित जपान दौरा पीएम मोदी यांच्या आवाहनानंतर रद्द करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रातील आमदारांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. विधीमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जपानच्या दोन राज्यांतील गव्हर्नरकडून भेटीचे निमंत्रण आले होते. या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील १२ आमदारांचे शिष्टमंडळ जाणार होते. पण पीएम मोदींच्या आवाहनानंतर त्यांनी दौरा रद्द केला.
दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका फक्त भारतालाच नाही तर जगभरातील अनेक देशांना बसत आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असून तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगावर असलेले हे संकट लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन सभांमध्ये भारतातील जनतेला इंधनाची बचत करा असे आवाहन केले. त्याचसोबत वर्षभर सोनं खरेदी करू नका असे सांगितले.
पीएम मोदी यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेल खूप महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. परदेशात लग्न करणे, परदेशात प्रवास करणे आणि परदेशात सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी जाणं ही संस्कृती मध्यमवर्गामध्ये प्रचलित होत आहे. पण आपण ठरवले पाहिजे की या संकटाच्या काळात आपण परदेश प्रवास किमान एक वर्षासाठी पुढे ढकलला पाहिजे. त्याचसोबत वर्षभर सोनं खरेदी करू नये. आपण वर्कफ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्स आणि व्हर्च्युअल मीटिंग्जला पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.