Malegoan Politics Former MLA Asif Sheikh Rashid  
महाराष्ट्र

Assembly Election: शरद पवार गटाला मोठा धक्का; मालेगावमधील माजी आमदाराने सोडली पक्षाची साथ

Bharat Jadhav

अजय सोनवणे , साम प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्यमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. शरद पवार गट राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी अपक्ष उमेदवारीची केली घोषणा केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळणार नसल्याची शक्यता नसल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराने शरद पवाराची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय.

आगामी विधान सभेत मालेगाव मध्यची जागा परंपरागत काँग्रेसची असल्याने संधी मिळणार नाही. त्यामुळे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी अपक्ष निडवणूक लढणार असल्याची घोषणा केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसिफ शेख रशीद यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शक्यतांवर चर्चा करत अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. रशीद यांच्या या निर्णयाला पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मालेगावमधील माजी आमदार आसिफ रशीद शेख हे अजितदादा पवार यांच्या सोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी जिल्हापद्धधिकारी म्हणून काम सुरू केले. लोकसभेला त्यांनी धुळे-मालेगाव मतदार संघातून उमेदवारीची तयारी केली होती मात्र महाविकास आघाडीकडून ही पारंपरिक काँग्रेसची जागा असल्याने काँग्रेसला सोडली. मात्र आगामी विधान सभेसाठी सुद्धा ही जागा काँग्रेसची असल्याने ती महाविकास आघाडी काँग्रेससाठी मागण्यास आग्रही राहील.

हे लक्षात येताच अस्वस्थ झालेले आसिफ शेख यांनी आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी सर्वांनी मिळून अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली. तसे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या निर्णयाचे पत्र पाठवले. रशीद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आगामी विधानसभा निवडणूक माजी आमदार आसिफ शेख हे अपक्ष लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT