Amol Mitkari: कारवर हल्ला करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का? आमदार मिटकरी यांचे CM शिंदेंवर गंभीर आरोप

Amol Mitkari Slams On CM Shinde: राज ठाकरे सुपारीबाज असल्याची टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला केला होता.
Amol Mitkari: कारवर हल्ला करणाऱ्यांना  मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का? आमदार मिटकरी यांचे CM शिंदेंवर गंभीर आरोप
Amol MitkariSaam Tv
Published On

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

मनसे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद मिटतांना दिसत नाही. मनसे नेते आणि मिटकरी यांच्याकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात अमोल मिटकरी यांनी त्यांच्या कारवरील हल्लाप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणातील आरोपींना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का?, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना केलाय.

राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी ३० जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला चढवला होता. यावेळी मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या राड्यात सहभागी असलेले मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे अजूनही फरार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप मिटकरी यांनी आता केलाय.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये कुठेतरी पाणी मुरलंय. अकोला पोलीस कर्णबाळाचा शोध का घेत नाही? असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय.पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय उपस्थित करत तुमच्यावर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे का? असा सवाल मिटकरी यांनी पोलीस यंत्रणेला विचारलाय.

एका आमदारावर हल्ला होतो, मुख्यमंत्री साधी विचारणा करत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं माझ्यावर प्रेम नाही अथवा कमी झालंय, असेही अमोल मिटकरी म्हणालेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राड ठाकरे यांची भेट झाली होती. त्या भेटीवरुन मिटकरी यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केलेत. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे याच्या दोन तासांच्या झालेल्या बैठकीत आपल्या विरोधात काही शिजलंय का? त्यामुळे त्या प्रकरणातला प्रमुख सूत्रधार कर्णबळा दुनबळेला अटक होत नाहीय, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी एकदाही आपली साधी विचारपूस केली नसल्याची खंतही आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलेल्या आरोपांनाही मिटकरी यांनी उत्तर दिलंय. योगेश चिले हा खंडणीबहाद्दर आहे. पनवेल परिसरात चिलेंनी अनेक कंत्राटदारांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. योगेश चिले हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाने राजगडावर बसून कंत्राटदारांकडून खंडण्या वसूल करत असल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. या संदर्भातील अनेक ठोस पुरावे आपल्याकडे असून लवकरच पनवेल येथे जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Amol Mitkari: कारवर हल्ला करणाऱ्यांना  मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का? आमदार मिटकरी यांचे CM शिंदेंवर गंभीर आरोप
VIDEO: मुलीसह Amol Mitkari यांचं ठिय्या आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची केली होती तोडफोड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com