Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Shinde vs Thackeray : औरंगाबादेत शिंदे गटाला जबर धक्का! सर्वात मोठी ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या ताब्यात

औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का दिला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून निकालाचे पहिले कल हाती येत आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळत आहे. अशातच, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे प्राथामिक कल हाती आले असून औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का दिला आहे. (Latest Marathi News)

औरंगाबादेत जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिडकीन ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) बाजी मारली आहे. बिडकीनमध्ये ठाकरे गटाचे अशोक धर्मे यांनी विजय मिळवला आहे. अशोक धर्मे हे जवळपास १२०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत निवडणूक असल्याने जवळपास सर्वच दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

अशातच औरंगाबादचे पालकमंत्री तथा शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे यांच्या बालेकिल्ल्यातच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पैठण तालुक्यातील सर्वात मोठ्या बिडकीन ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) ठाकरे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातीलच ग्रामपंचायत हातातून गेल्याने शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणुकीत आपल्याच पॅनलचा विजय व्हावा, तसेच ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहे. औरंगाबादेतील २१६ ग्रामपंचायतीपैकी जवळपास ८३ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ठाकरे गट १७, शिंदे गट २६, भाजपा २० राष्ट्रवादी ५, काँग्रेस ५ आणि इतर १० ग्रामपंचातीवर अपक्षांनी बाजी मारली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT