संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे पंढरपुरात भूमिपूजन भारत नागणे
महाराष्ट्र

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे पंढरपुरात भूमिपूजन

नितीन गडकरींसह मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यासह संत मंडळाच्या उपस्थितीत कार्यक्रम

भारत नागणे

पंढरपूर - पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंढरपुरात सकाळी 11 वाजता होणार आहे.रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संत मंडळींच्या हस्ते या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे,अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील पहा -

दरवर्षी लाखो भाविक पायी आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी या मार्गाचेचौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगती पथावर आहे. कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रम घेता आला नाही. त्यानंतर आता येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर या कार्यक्रमाचे आजोजन कऱण्यात आले असून या कार्यक्रमासाठी दहा हजार लोकांची उपस्थिती राहणर आहे.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्रमुख संत मंडळींना निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या हस्ते पालखीमार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांनी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. याबाबतची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे आदी उपस्थित होते.

Edited By - Shivnai Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live News Update: शिवसेना उबाठाचे गोकुळ दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT