पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे अग्निशमनचे वाहन उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज कर्मचारी यांनी आग लागल्याचे समजताच काही काळ परिसरातील वीजपुरवठा तात्पूरता खंडित केला. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
सिंधूदूूर्ग : मालवण बाजारपेठेत असणा-या विलास ऍग्रो या दुकानास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केली जात आहेे. दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने त्याची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत पाेहण्यास वेळ लागला. परंतु अवघ्या काही वेळातच व्यापारी वर्ग बाजारपेठेत एकवटला आणि त्यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तब्बल तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात सर्वांना यश आले. fire-in-malvan-market-sindhudurg-marathi-news-sml80
ही आग विझवण्यासाठी पालिकेने सुमारे आठ फायर बॉल घटनास्थळी टाकले. आगीने राैद्ररुप धारण केल्याने आग नियंत्रणात येत नव्हती. पालिकेच्या कर्मचा-यांसह, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या परिसरातील अमेय देसाई यांनी वाहन धुण्यासाठी वापरण्यात येणारी फोर्स पाईप आणून दुकानांच्या छपरावर चढून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.
स्वप्नील अंधारी, फारूक ताजर, रणजित पारकर यांनीही इतर दुकांनाच्या पत्र्यावर चढून आग विझवत असताना रणजित पारकर हे छपरावरून कोसळले. त्यांना दुखापत झाली. नगराध्यक्ष यांचाही अंगावर विटा कोसळल्या. एकूणच स्थानिक व्यापारी आपल्या जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न करत होते.
दरम्यान मालवण पालिकेने नवीन अग्निशमन वाहन येईपर्यंत जुने अग्निशमन वाहन आहे ते आमच्या ताब्यात द्या, आम्ही दुरुस्त करुन वापरताे. दिवाळीच्या कालावधीत जिल्ह्यातून एखादी अग्निशमन वाहन मालवण शहरात आणून ठेवणे गरजेचे आहे. पालिकेने याबाबत व्यवस्था करावी आम्ही त्या दिवसाचे शुल्क भरू अशी मागणी उमेश नेरुरकर यांनी केली आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.