Trupti Desai Saam Tv
महाराष्ट्र

शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या निर्णयाला भूमाता ब्रिगेडचा विरोध

निर्णय विश्वस्त मंडळाने मागे घ्यावा अन्यथा भुमाता ब्रिगेड आवाज उठवणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबीन खान

अहमदनगर - शनिशिंगणापूरमध्ये आता चौथऱ्यावर महिलांना देखील तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. विश्वस्तांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र ज्या भाविकांना शनी देवाला तेल अभिषेक करायचा आहे त्यांना देणगी म्हणून ५०० रुपाये मोजावे लागणार आहे. ५०० रुपयांची देणगी पावती घेणाऱ्या सर्व महिला किंवा पुरुषांना चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष भागवत बानकर यांच्या कडून देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली. मात्र या निर्णयाला आता भूमाता ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

शनिशिंगणापूर येथील चौथ-यावर जावून भक्तांना आता देवाला स्वतः तेलाचा अभिषेक करता येणार आहे. शनीदेव संस्थानने शनिवारपासून ही सशुल्क सेवा सुरू केली आहे. मात्र भक्तांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. महीला व पुरुष भक्तांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन व तेलाभिषेक करता येणार असल्याने ट्रस्टींच्या या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र 500 रुपयांच्या पावतीचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय गरीब आणि श्रीमंत भक्तांमध्ये भेदभाव करणारा आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. हा निर्णय विश्वस्त मंडळाने मागे घ्यावा अन्यथा भुमाता ब्रिगेड आवाज उठवणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

शनि शिंगणापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देशभरातून शनिभक्त दर्शनासाठी येत असतात. साडे साती घालवण्यासाठी अनेक भाविक शनीदेवाला तेलाचा अभिषेक घालतात. ही परंपरा असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने शनीदेवावर तेल अर्पण करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

Maharashtra News Live Update: केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवादच झालेला नाही - उद्धव ठाकरे

Devisha Shetty: 'हिंसाचार म्हणजे लोकशाही नाही', सूर्यकुमार यादवच्या पत्नीची पोस्ट चर्चेत; CJP आंदोलनावर स्पष्ट केली भूमिका

Kanda Bhaji Recipe : १ थेंबही तेल न वापरता बनवा कुरकुरीत कांदा भजी, वापरा 'ही' सिक्रेट ट्रिक

SCROLL FOR NEXT