छगन भुजबळ कांदा Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly: पुन्हा कांदा पेटला...! निर्यात बंदी उठवा, भुजबळ आक्रमक; शिंदेंकडून कांद्याचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

Onion Crisis: लोकसभेला सत्ताधाऱ्यांना रडवणाऱ्या कांद्यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.. मात्र कांदा प्रश्न का पेटलाय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता पुन्हा एकदा पेटलाय...कांद्याच्या निर्यातीवरील 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन छेडलंय...तर छगन भुजबळांनीही सरकारला घरचा आहेर देत निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केलीय.. त्यावर पणनमंत्री जयकुमार रावलांनी कांद्यावरचा निर्यात कर 20 टक्क्यावर आणल्याचा दावा केला..

यानंतर पणनमंत्र्यांच्या उत्तरावर असहमती दर्शवत भुजबळ चांगलेच आक्रमक झाले...नाफेडच्या कारभाराचीही भुजबळांनी चिरफाड केलीय..तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कांद्याचा प्रश्न केद्र सरकारवर सोपवून आपले हात झटकले.

तर अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय....

लोकसभेला फटका बसल्यानंतर सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क 20 टक्क्यांनी कमी केलं... त्याचा महायुतीला फायदा झाला.. मात्र आता कांद्याचे दर पुन्हा पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.. त्यामुळे सरकार कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार का? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT