Shiv Sena (UBT) workers stage ‘Jode Maaro’ protest in Bhiwandi against rebel MPs and central leadership. saam tv
महाराष्ट्र

ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

Shiv Sena UBT Protest Against Rebel MPs In Bhiwandi: भिवंडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून फुटलेल्या सहा खासदारांच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

Omkar Sonawane

फैय्याज शेख, साम टीव्ही

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांच्या निषेधार्थ भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संबंधित खासदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान नेत्यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जनतेचा आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

शिवसैनिकांनी मेहनत, वर्गणी आणि संघर्षाच्या जोरावर निवडून दिलेल्या खासदारांनी स्वार्थासाठी पक्षांतर केल्याचा आरोप करत त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रथम आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे, अशी मागणी करण्यात आली.

मागच्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरने राज्यात खळबळ उडवून दिली असून उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट हा आक्रमक झाला असून याचे ठिकठिकाणी पडसाद उमटत आहे.

यावेळी बोलताना शिवसेना नेत्यांनी शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहील आणि महाराष्ट्रासह दिल्लीत भगवा फडकवेल, असा निर्धार व्यक्त केला. केंद्रातील भाजप सरकारवरही जोरदार टीका करण्यात आली. भाजपासोबत राहिल्यास देशाचे नुकसान होईल, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आला. मोदी आणि शाह यांचा उल्लेख ‘रंगा-बिल्ला’ असा करत टीका केली. या आंदोलनात उबाठा नेते विश्वास थळे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील, भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष मनोज गगे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू

Akola By-poll: अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उपमा; वाचा सोपी रेसिपी

शेकाप-भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले, तरीही शिंदेसेना जिंकली; विजयाचा झेंडा फडकवत प्रतिष्ठा राखली

ENG vs IND : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या विश्वासूला संघात स्थान; विराटचं कमबॅक झालं का?

SCROLL FOR NEXT