Suresh Mhatre Balya Mama Saam Tv
महाराष्ट्र

Bhiwandi Politics: शहरात जातीय तेढ, दंगली घडवण्याचा कपिल पाटलांचा कट; बाळ्या मामांचा खळबळजनक आरोप, भिवंडीत वातावरण तापलं

Suresh Mhatre Balya Mama Against Telangana MLA T Raja Singh Sabha: भिवंडीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेला तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांच्या उपस्थितीला भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी विरोध दर्शविला आहे.

Rohini Gudaghe

फैय्याज शेख, साम टीव्ही मुंबई

भिवंडी तालुक्यातील पडघा टोलनाका परिसरात आज सायंकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत तेलंगाना येथील आमदार टी राजा सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भिवंडी लोकसभेचे नवनियुक्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी या कार्यक्रमातील टी राजा सिंग यांच्या उपस्थितीवर विरोध दर्शवला आहे.

टी राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळे भिवंडी शहरासोबत ग्रामीण भागातील धार्मिक सद्भवाचे वातावरण खराब होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या कार्यक्रमास त्यांना परवानगी देऊ (Bhiwandi Politics) नये, अशी मागणी बाळ्या मामांनी शुक्रवारी पोलीस यंत्रणेकडे केली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बाळ्या मामांचे आरोप काय?

हा कार्यक्रम कपिल पाटील यांच्या छुप्या अजेंड्याने आयोजित केला आहे. मी सुध्दा हिंदू आहे. या कार्यक्रमास आमचा विरोध नाही, परंतु मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले? असा सवाल बाळ्या मामा यांनी (Suresh Mhatre Balya Mama) उपस्थित केला आहे.

त्यांनी शहरात जातीय तेढ आणि भिवंडीत दंगली घडवण्याचा कट कपिल पाटील करीत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. आमदार टी राजा सिंह यांच्यावर १०५ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत, तर १८ ते २०गुन्हे जातीय तेढ निर्माण करणारे आहे.

सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस

भिवंडी मुस्लिम बहुल शहर आहे. अशा ठिकाणी जर जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत (Telangana MLA T Raja Singh) असतील, तर धार्मिक वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या सभेला विरोध नाही, तर या सभेमध्ये वक्तव्य करणारे टी राजा सिंह यांना विरोध असल्याचं बाळ्या मामा यांनी सांगितलं आहे.या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारे अनेक स्टेटस देखील फिरवले (Kapil Patil) जात आहेत. त्याविरोधात सुध्दा कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली असल्याची माहिती बाळ्या मामा यांनी यावेळी दिली आहे.

कपिल पाटील यांची प्रतिक्रिया

बाळ्या मामा यांच्या आरोपांना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलंय की, नवीन नवीन खासदार झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. मी सत्तेत असताना कोणती ही दंगल घडली नव्हती. आम्ही दंगल घडवणाऱ्यांपैकी नव्हे. प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्मचा अभिमान असला पाहिजे, परंतु तो प्रत्येकाने आपल्यापूरता मर्यादित ठेवला पाहिजे. आपल्यावर कोणतेही खोटेनाटे आरोप केलेले आपण खपवून घेणार नाही. लवकरच त्यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला भरणारा असल्याचा इशारा कपिल पाटील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT