Suresh Mhatre : शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच बाळ्या मामा प्रशासनाच्या रडारवर; भिवंडीतील गोदामांवर MMRDAकडून कारवाई

Suresh Mhatre Latest News : शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा यांच्या भिवंडीतील गोदामांवर 'एमएमआरडीए'कडून कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईनंतर सुरेश म्हात्रे यांनी मंत्री कपिल पाटील यांच्या टीका केली आहे.
Suresh Mhatre
Suresh MhatreSaam tv

फैय्याज शेख, भिवंडी

Suresh Mhatre bhiwandi News :

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा यांच्या भिवंडीतील गोदामांवर 'एमएमआरडीए'कडून कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईनंतर सुरेश म्हात्रे यांनी मंत्री कपिल पाटील यांच्या टीका केली आहे.

भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभेतून उमेदवार जाहीर झाल्यानंतर बाळ्या मामा यांच्या गोदामांवर कारवाई केली आहे.

बाळ्या मामा यांच्या गोदामांवर 'एमएमआरडीए'कडून कारवाई केली आहे. भिवंडीच्या येवई येथील आरके लॉजी पार्क येथे त्यांच्या गोदामाचे बांधकाम सुरु आहे. त्या बांधकामवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर बाळ्या मामा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Suresh Mhatre
Konkan Politics : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ : नितेश राणेंचं वैभव नाईक, विनायक राऊतांना समाेरासमाेर येण्याचे आव्हान

'संपूर्ण भिवंडी तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकामांचं संरक्षण करण्यासाठी प्रस्ताव दाखल असून उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत, असे सुरेश म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Suresh Mhatre
NCP Symbol Dispute : ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हाचा वाद कोर्टात; दोन्ही गटांच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

'मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून 90 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत, असा आरोपही बाळ्या मामा यांनी केला.

'एमएमआरडीए' राजकीय दबावातून कारवाई केली जात आहे. 'जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते, असा टोला देखील सुरेश म्हात्रे यांनी भिवंडीतील भाजप उमेदवार कपिल पाटील यांना लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com