MP Suresh Mhatre : कामाचा दर्जा चांगला ठेवा, कोणतीही हयगय करणार नाही!; खासदार सुरेश म्हात्रेंचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra Politics 2024 : कामाचा दर्जा चांगला नसला तर कोणतीही हयगय न करता अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करणार, असा इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे दिला आहे.
MP Suresh Mhatre
MP Suresh MhatreSaam Digital
Published On

माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर अधिकारी ठेकेदारावर कारवाई करणार ,कोणतीही हयगय करणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी अधिकारी ठेकेदाराना दिलाय .सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग कोसळल्याची घटना घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुरुजाची पाहणी केली. यावेळी खासदार म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोन वर संपर्क साधत बुरुजाच्या डागडुजीचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या .

शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग ढासळल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली . घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शिवसेना शिंंदे गटाचे पदाधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी शिवसेना पदाधिकार्यानी पुरातत्व विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे किल्ल्याची दुरवस्था असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी या किल्ल्याच्या डागडुजीसाठी १२ काेटी ५० रुपये निधी मंजूर केला होता. मात्र काही काम झाले. काही काम निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यावर थांबविले गेल्याचे सांगितले . या घटनेनंतर महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.यावेळी खासदार म्हात्रे यांनी थेट जिल्हाधिकार्यांना फोन लावला.

MP Suresh Mhatre
Shahpur Crime News: क्रूर बापानं गाठला कळस! पत्नीसोबत भांडण झाल्याने 8 वर्षीय मुलाची केली निर्दयपणे हत्या

आचारसंहितेमध्ये अशी कामे थांबविता येत नाहीत ही कामे त्वरीत सुरु करावीत. अधिकाऱ्यांना आदेश द्यावा अशी सूचना केली .जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी फोनवरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना काम सुरु करण्याचे आदेश दिले. या कामाकरीता पाच कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. यावेळी बोलताना खासदार म्हात्रे यांनी पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला.मात्र आता दुरुस्तीचे काम सुरू होईल ,कामाचा दर्जावर आमचे लक्ष असेल . मी कोणत्याही कामात एक टक्काही घेणार नाही.माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर अधिकारी ठेकेदारावर कारवाई करणार ,कोणतीही हयगय करणार नाही असा इशारा दिला.

MP Suresh Mhatre
BJP च्या मराठा आमदारांची कानउघाडणी, भाजपकडून लोकसभेच्या पराभवाचं चिंतन-मंथन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com