Bhiwandi Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Crime : दरोडा टाकण्याच्या होते तयारीत; पोलिस पथक दाखल होताच उडाली तारांबळ; पाठलाग करत चौघेजण शस्त्रांसह ताब्यात

Bhiwandi News : शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ पाच व्यक्ती त्यांचे सोबत हत्यारे घेवून दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख  

भिवंडी : भिवंडी शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत शस्त्रांसह रेकी करत होते. यापूर्वीच पोलिसांच्या पथक दाखल झाल्याने दरोडेखोरांनी पळ काढला. मात्र पाठलाग करत चार जणांना शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ एक बीएमडब्ल्यू कार, दोन गावठी कट्टा, दोन पिस्टल असा एकूण १७ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. 

भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ पाच व्यक्ती त्यांचे सोबत हत्यारे व अग्नीशस्त्र घेवून दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली. त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश गायकर व पोलिस पथकाला रवाना केले. 

पोलिसांचे पथक दाखल होताच पडण्याचा प्रयत्न 

पोलीस पथक घटनास्थळी धाव घेत रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित बीएमडब्लू कार जवळ जात असताना कार चालकाने कार पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून बीएमडब्लू कार थांबविली. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला. तर कारमधील शोएब शाहीद शेख, नौशाद मक्सुद आलम खान, अफताब अफसर शेख, शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेवून कारची झडती घेतली. यावेळी त्यांच्याजवळ दोन देशी बनावटीचे कट्टे, दोन देशी बनावटीचे पिस्टल, एक लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड, दोरखंड, तीन कपड्‌याचे मास्क, मिरची पुड, एका पिशवीमध्ये सफेद रंगाचे ४ जोड हॅन्डग्लोज, चाकु, सेलो टेप, मोबाईल आढळून आला. 

१७ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

शांतीनगर पोलिसांनी १७ लाख ३५ हजार २०० रूपये किंमतीच्या मुद्देमालासह चार आरोपी यांना दरोडा घालण्याचे तयारीत असतांना त्यांना पकडून त्यांचे विरूध्द शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तर शनिवारी सकाळी भिवंडी न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे; अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT