Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावरील डोहोळ गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. देवदर्शनहून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली.

Bharat Jadhav

  • मुंबई-नाशिक महामार्गावर बापलेकीचा दुर्दैवी अपघात झाला.

  • भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला.

  • राजेश अधिकारी आणि वेदिका अधिकारी हे शहापूर तालुक्यातील सरळांबे गावचे रहिवासी होते.

फैयाज शेख, साम प्रतिनिधी

मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झालाय. भिवंडी तालुक्यातील डोहळे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव ट्रकनं दुचाकीला मागून टक्कर दिल्यानं हा अपघात घडला असून यात बापलेकीचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश अधिकारी (वय 39) व वेदिका अधिकारी (वय 11) असं अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत.

बापलेकी हे देवदर्शन करण्यासाठी गेले होते. देव दर्शनावरून घरी परतत असताना भिवंडी तालुक्यातील डोहोळे गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. डोहोळे गावाजवळील महामार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रॅकने त्यांच्या दुचाकीस मागून धडक दिली यात दोघाचा मृत्यू झाला. राजेश अधिकारी आणि वेदिका अधिकारी हे शहापूर तालुक्यातील सरळांबे गावातील रहिवासी होते. दरम्यान या घटनेचा तपास पडघा पोलीस करीत आहेत.

लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जाताना अपघात

मुंबईमध्ये भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लालाबागच्या राजाचे दर्शन घेऊन घरी परत जात असताना अपघात झाला. ही घटना पवई जेवीएलआर मार्गावर घडली. पवईतील जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील भवानी पेट्रोल पंप येथे हा अपघात झाला. बेस्ट बसने दुचाकीला धडक दिली.

धडक बसल्यानंतर दुचाकीवरील दोघेजण खाली पडले, यातील एकजण बसच्या चाकाखाली आला असून त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. दरम्यान हा अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. देवांश पटेल (२२ वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर स्वप्नील विश्वकर्मा (२२ वर्षे) हा तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT