Mumbai Nashik Highway Traffic Saam tv
महाराष्ट्र

Traffic Jam Video : मुंबई- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Bhiwandi News : भिवंडी शहरात देखील सकाळपासून पाऊस सुरु असल्याने भिवंडी- ठाणे बायपास मार्गावर वाहतूकची समस्या निर्माण झाली आहे.

Rajesh Sonwane

फय्याज शेख 
भिवंडी
: भिवंडी शहरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले असतानाच मुंबई- नाशिक महामार्गावरील भिवंडी- ठाणे बायपास मार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी झाली आहे. परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

राज्यातील अनेक भागात (Rain) पावसाने आज हजेरी लावली आहे. काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. भिवंडी शहरात देखील सकाळपासून पाऊस सुरु असल्याने भिवंडी- ठाणे बायपास मार्गावर वाहतूकची समस्या निर्माण झाली आहे. भिवंडी- ठाणे बायपास महामार्गावर आठ पदरी मार्गाचे काम सुरु असून हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे ठीक ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.  

वाहतूक सुरळीत होण्यास चार- पाच तासांचा कालावधी 

या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका या मार्गावरील माल वाहतूक करणारे व प्रवासी यांना बसत आहे. तर नाशिकच्या दिशेने देखील संथ गतीने वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी सुमारे चार ते पाच तास लागू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT