Raj Thackeray rally
Raj Thackeray rally Saam Tv
महाराष्ट्र

मनसेची सभा उधळून लावण्यावर भीम आर्मी ठाम, कार्यकर्ते औरंगाबादकडे रवाना

विश्वभूषण लिमये

सोलापूर: औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची तोफ धडाडणार आहे. राज गर्जनेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. आजच्या सभेत राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार? सभेत काय बोलणार, याचीच उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे. यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. अशातच, भीम आर्मीने (Bhim Army) ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यावर आपण ठाम असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली आहे.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. राज यांच्या या भूमिकेमुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय पक्षातील विविध नेत्यांनी दिल्या आहे. दरम्यान आज होणाऱ्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी 16 अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी या अटीचे त्यांनी उल्लंघन केलं, तर महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला होता.

या इशाऱ्यावर आपण ठाम असल्याचं भीम आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली आहे. जर राज यांनी पोलिसांच्या अटींचं उल्लंघन केलं तर, त्यावेळी महापुरुषांच्या नावाने घोषणा देत सभा बंद पाडू तसेच राज ठाकरेंना सविधानाची प्रत भेट देऊ असं भीम आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेमुळे निर्माण झालेला हा वाद आणखी काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत

Chandrashekhar Bawankule Meets Chhagan Bhujbal : बावनकुळे, भुजबळांमध्ये भेट! कारण काय?

FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

Today's Marathi News Live : मोदींनी दहा वर्षात काय केलं ते सांगाव; नाना पटोले यांची टीका

SCROLL FOR NEXT