Sakshi Sunil Jadhav
आजकाल फोन हा सगळ्यांच्याच आवडीचा आणि महत्वाचा भाग झाला आहे. पण काही लोकांचे फोन सतत खराब होतात. त्याचं कारण म्हणजे चार्जिंग आहे.
पुढे आपण फोनला किती टक्के चार्जिंग झाल्यावर बंद केला पाहिजे आणि त्याने कोणत्या समस्या टळू शकतात. हे जाणून घेणार आहोत.
आजच्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरली जाते. या बॅटरीसाठी ठराविक चार्जिंग रेंजमध्ये राहणं जास्त फायद्याचं मानलं जातं.
फोन 80 टक्के नंतर 100 टक्के पर्यंत चार्ज होताना बॅटरीवर जास्त ताण पडतो. तुम्ही हे रोज केलं तर बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होते.
प्रवास किंवा गरजेच्या वेळी 100 टक्के चार्ज केल्याने त्याचा फायदाच होतो. पण मुद्दाम करणं खर्चिक ठरेल.
तज्ज्ञांच्या मते फोनची बॅटरी 20% ते 80% दरम्यान ठेवणं सर्वात महत्वाचं आहे. यामुळे बॅटरीवरचा ताण कमी होतो.
जर फोन वर्षानुवर्षे चांगला चालावा असं वाटत असेल, तर 80 ते 85% च्या आसपास चार्जिंगवर फोन चालवा.
बॅटरी 5% किंवा 10% पर्यंत आल्यावरचं चार्जिंगला लावणं टाळा. त्याने फोन लवकर खराब होतो.
फोन पूर्ण रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका. त्याने बॅटरीवर ताण येतो, ती गरम होते आणि काहीच दिवसात खराब होते.