वाळू माफियांची दादागिरी! महिला तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर | VIDEO

sand mafia tries to kill woman talathi in Buldhana : बुलढाण्यात रायपूर येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना वाळू माफियांनी महिला तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा धक्कादायक प्रयत्न केला.

बुलढाणा जिल्ह्यातील रायपूरमध्ये वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना वाळू माफियांनी थेट महिला तलाठ्याच्या जीवावर उठण्याचा धक्कादायक प्रकार घडला. रायपूर येथील तलाठी उषा देशमुख या तलाठी कार्यालयासमोर असताना, गावातील ज्ञानेश्वर मुरडकर हा व्यक्ती नंबर प्लेट काढलेल्या ट्रॅक्टरमधून अवैध रेती वाहतूक करत होता. उषा देशमुख यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारवाई टाळण्यासाठी आरोपीने थेट तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, या प्रकरणी ट्रॅक्टर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com