Bhikan Rojeker साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

पत्र्याचं घर, आर्थिक परिस्थिती हलाखीची; मजुराचा मुलगा IPS झाला, राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव

Labourer Son From Jalna Clears UPSC Exam: जालना जिल्ह्यातील शेतमजुराचा मुलगा भिकन रोजेकर याने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IPS पद मिळवले.

Omkar Sonawane

अक्षय शिंदे, साम टीव्ही

UPSC परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. जालना येथील एका सालगड्याच्या मुलाने यश संपादन करत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या जळगाव सपकाळ येथे राहणाऱ्या एका मजुराच्या मुलाने UPSC परीक्षेत उतीर्ण होत IPS पदाला गवसणी घातली आहे. 26 वर्षाच्या भिकन रोजेकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 812 क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे. अतिशय कष्टातून शिकवणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न त्याने पूर्ण केले. भिकनच्या या यशामुळे तो राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मोठा आनंद उत्सव पाहायला मिळतोय.

भिकनचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले असून महाविद्यालयिन शिक्षणासाठी त्याने छत्रपती संभाजीनगर गाठलं घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे एका NGO च्या माध्यमातून त्यांनी दिल्ली येथे राहून यूपीएससीचा (UPSC) अभ्यास केला, त्याला अनेक वेळा अपयश आले. मात्र सहाव्या प्रयत्नात त्याने अखेर हे यश संपादन केलंच.

भिकनचे वडील जगन रोजेकर यांनी दुसऱ्याच्या शेतात राबून भिकनच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला. दरम्यान आई-वडिलांचे अपार कष्टाने आपल्याला प्रेरित केलं. मित्र आणि नातेवाईकांनी यासाठी आपल्याला साथ दिल्यामुळे आपण हे यश मिळवल्याचं भिकनने म्हटले आहे.

अनेकजण हे पैसे नाही, परिस्थिति खराब, आणि नशिबाला दोष देत शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. मात्र जिद्द, चिकाटी आणि शिकण्याची धमक असेल तर यश हे दूर नाही हे भिकनने दाखवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT