Bhendwal Bhavishyavani 2024 Saam TV
महाराष्ट्र

Bhendwal Bhavishyavani : भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; पाऊस आणि शेती पिकांबाबत केलं मोठं भाकित

Bhendwal Ghatmandni : यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात. दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात. आज शनिवारी पहाटे ६ वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली.

चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली. यानंतर घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आलं आहे. यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे. भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल.

सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल. एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावर्षी खरीप पिके साधारण राहील. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल.

पिकांची नासाडी देखील होईल, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पिक सर्वात चांगलं राहील, असं भाकित देखील वर्तवण्यात आलं आहे. आचारसहिंता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही. भेंडवळच्या घट मांडणीवेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

Saif Ali Khan: 'हल्लेखोराकडे एक नाही तर दोन चाकू...'; ८ महिन्यांनंतर सैफ अली खानने केला त्या रात्रीचा धक्कादायक खुलासा

Air Purifying Plants: प्रदूषणाने त्रस्त आहात? तर घरात लावा ही 5 झाडे, हवा राहील शुद्ध

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडी मोर्चा

SCROLL FOR NEXT